BREKING : बक्षीस ठेवलेला मध्यप्रदेशातील फरार आरोपी रावेर पोलिसांच्या पिंजऱ्यात : सेंधवा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल

रावेर पोलिसांची कामगिरी

BREKING : बक्षीस ठेवलेला मध्यप्रदेशातील फरार आरोपी रावेर पोलिसांच्या पिंजऱ्यात : सेंधवा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल

प्रतिनिधी / रावेर

सेंधवा जि बडवानी (मध्यप्रदेश) येथील पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दखल असलेला आरोपी महेंद्र भगवान राठोड हा गुन्हा दखल झाल्यापासून फरार होता. तो मध्यप्रदेश पोलिसांना सापडत नसल्याने त्याची माहिती सांगणाऱ्या व्यक्तीला मध्यप्रदेश पोलिसांतर्फे दोन हजार रुपयांचे बक्षीस ठेवण्यात आले होते. मात्र हा आरोपी रावेर पोलिसांच्या पिंजऱ्यात अलगद सापडला आहे. आरोपी महेंद्र राठोड हा पाल परिसरात संशयास्पद रीतीने फिरत असल्याची माहिती पोलीस निरीक्षक डॉ विशाल जयस्वाल यांना मिळाली. त्यांनी पोलीस उपनिरीक्षक तुषार पाटील, पोलीस कर्मचारी ईश्वर चव्हाण, महेश मोगरे, प्रमोद पाटील, सचिन घुगे यांचे पथक पाठवून आरोपीला ताब्यात घेतले. त्याची चौकशी केली असता त्याच्यावर सेंधवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून तो तेव्हापासून फरार असल्याची माहिती मिळाली. आरोपीची गुप्त माहिती देणाऱ्यांना मध्य प्रदेश पोलिसांतर्फे दोन हजार रुपयांचे बक्षीस लावण्यात आले होते. सदर आरोपीला सेंधवा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.