रावेर नगरपालिका निवडणूक : प्रभागाचा सर्वांगीण विकास हाच ध्यास : सीमा जमादार
महिला नेतृत्वाचा उगवता चेहरा
प्रतिनिधी/रावेर
येथील नगरपालिका निवडणुकीला अवघे पाच दिवस उरले आहेत. प्रचाराने सर्वच प्रभागात जोर धरला असून या निवडणुकीत नवख्या उमेदवारांना राजकीय पक्षाने संधी दिली आहे. प्रभाग क्र ११ अ मधून महिलेच्या आरक्षित जागेवर सीमा आरिफ जमादार यांना भाजपने अधिकृत उमेदवारी देत राजकीय प्रवेशाची संधी दिली आहे. प्रभागाचा सर्वांगीण विकास हाच आपला ध्यास असा निर्धार उमेदवार सीमा जमादार यांचा आहे. मतदारांचा उत्स्फुर्तपणे पाठींबा मिळत असल्याने भाजपचा विजय निश्चित आहे असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.
प्रभाग ११ अ मधून भाजपतर्फे सीमा आरिफ जमादार, राष्ट्रवादी कॉंग्रेसतर्फे (शरद पवार गट) तसलीमबानो सुभान पठाण आणि अपक्ष उमेदवार म्हणून दिपाली भूषण तायडे व सरस्वती श्रीराम बडगुजर या निवडणूक रिंगणात आहेत. उमेदवार सीमा जमादार यांच्या कुटुंबाला समाजसेवेचा वारसा आहे. त्यासोबतच कुटुंबातील सदस्य प्रशसकीय सेवेत असल्याने पारदर्शक स्वच्छ व प्रशासकीय कामाची माहिती आहे. लोकप्रतिनिधी म्हणून काम करतांना याचा फायदा प्रभागातील समस्या, प्रश्न प्रभावीपणे मांडून ते सोडविण्यासाठी नक्की होईल असा विश्वास सीमा जमादार यांनी व्यक्त केला. प्रभागातील विकासकामे करतांना शासनाच्या वैयक्तिक लाभाच्या योजना लाभार्थ्यांपर्यंत पोहचविणे, महिला सक्षमीकरण यावर आपला अधिक भर राहणार असल्याचे त्यांनी सांगितले. सीमा जमादार यांनी प्रचारात आघाडी घेतली असून प्रभागातील प्रत्येक मतदारापर्यंत पोहचण्याचा त्यांनी प्रयत्न केला आहे. या भागातील मतदारांच्या अडीअडचणी समजून घेत असून त्या सोडविण्याला प्राधान्य राहणार आहे. या प्रभागातून सीमा जमादार यांची प्रतिस्पर्धी उमेदवारांच्या तुलनेत बाजू भक्कम असून मतदारांच्या पाठींब्यामुळे त्या विजयापर्यंत पोहचतील असा आशावाद मतदारांनी व्यक्त केला.

krushisewak 
