जैन इरिगेशनचे संचालक अनिल जैन यांना डी.वाय.पाटील कृषी व तांत्रीक विद्यापीठाची डॉक्टरेट प्रदान
शेतकऱ्यांसाठी केलेल्या कार्याचा गौरव : अनिल जैन
कोल्हापूर/ प्रतिनिधी –
कृषी व त्यातील शाश्वत विकासातील सातत्य व मोलाच्या योगदानाबद्दल जैन इरिगेशन सिस्टीम्स लिमिटेडचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकिय संचालक व जैन फार्मफ्रेश फूड्स ली चे अध्यक्ष अनिल जैन यांना येथील डॉ. डी. वाय. पाटील कृषी व तांत्रिक विद्यापीठाच्या वतीने आयोजित दिमाखदार सोहळ्यात डॉक्टर ऑफ सायन्स (D.Sc.) ही पदवी प्रदान करण्यात आली.
विद्यापीठाच्या पहिल्या पदवीदान दीक्षांत समारंभात राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत, विद्यापीठाचे कुलपती संजय पाटील, संस्थेचे विश्वस्त पृथ्वीराज पाटील, कुलगुरू प्रा. डॉ. के प्रथापन, रजिस्ट्रार डॉ. खोत यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात आली. सन २०२१ मध्ये स्थापन झालेले डॉ. डी. वाय. पाटील कृषी व तांत्रीक विद्यापीठ हे देशातील पहिले मान्यताप्राप्त खासगी विद्यापीठ आहे. या कार्यक्रमात सन्मानदर्शक पदव्यांसोबत ६६३ हून अधिक विद्यार्थ्यांना पदव्या प्रदान करण्यात आल्यात. डॉ संजय पाटील यांनी उभारलेल्या या विद्यापीठात हजारो विद्यार्थी शिक्षण घेत आहेत . १९८६ मध्ये अनिल जैन हे वाणिज्य आणि कायद्याची पदवी घेऊन पद्मश्री स्व. भवरलाल जैन यांनी उभारलेल्या व्यवसायात काम करून शेतकऱ्यांसाठी नवनवीन तंत्रज्ञान कसे आणता येईल याचा अभ्यास केला. गेल्या तीन दशकांनी जैन इरिगेशनला सूक्ष्म सिंचनात जागतिक अग्रेसर बनवले आहे.
शेतकऱ्यांसाठी करीत असलेल्या कार्याचा गौरव
शेती आणि शेतकरी हाच केंद्रबिंदू मानून जैन इरिगेशन गेल्या सहा दशकापासून काम करत आहे, शेतकरी बांधवांना आर्थिक सुबत्ता यावी यासाठी आम्ही नवनवीन प्रयोग सातत्याने करीत आहोतच, शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर हास्य हाच सर्वात मोठा बहुमान आहे ही भावना भवरलाल जैन यांची होती तीच भावना आज माझी होती, ही पदवी सर्व शेतकरी बांधव आणि सहकारी यांच्यावतीने स्वीकारताना मनस्वी आनंद झाला म्हणून ही पदवी त्यांनाच समर्पित करित आहे.
- अनिल जैन, उपाध्यक्ष, जैन इरिगेशन सिस्टीम्स लि.