आज गुलाबपुष्प, उद्या दंड : रावेरला पोलीस स्थापना दिनानिमित्त वाहनचालकांचे गुलाब पुष्पाने स्वागत : सर्वांनी वाहतुकीच्या नियमांचे पालन करावे : पोलीस निरीक्षक डॉ विशाल जयस्वाल
नियमांचे मी पालन करणार : राबवली स्वाक्षरी मोहीम

प्रतिनिधी / रावेर
पोलीस स्थापना दिनानिमित्त रावेर पोलीस स्टेशन तर्फे आज शहरातील डॉ बाबासाहेब आंबेडकर चौकात पोलीस निरीक्षक डॉ विशाल जयस्वाल यांच्या नेतृत्वात वाहन चालकांना वाहतुकीच्या नियमांची माहिती देण्यात आली. यावेळी वाहनचालकांचे डॉ जयस्वाल यांनी गुलाब पुष्प देवून स्वागत केले. आज गुलाब पुष्प उद्या मात्र दंड याचीही वाहन चालकांना ते जाणीव करून देण्यास विसरले नाहीत. तसेच मी वाहतुकीच्या नियमांचे पालन करेल असा संदेश देणाऱ्या फलकावर स्वाक्षरी मोहीम राबविण्यात आली.
जिल्हा पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी, अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नकाते, सहय्यक पोलीस अधीक्षक श्रीमती अन्नपूर्णा यांच्या मार्गदर्शनाखाली रावेर पोलीस स्टेशनतर्फे आज पोलीस स्थापना दिवसानिमित्त डॉ बाबासाहेब आंबेडकर चौकात वाहतूक नियमाविषयी स्वाक्षरी मोहीम राबविण्यात आली. सदर स्वाक्षरी मोहिमेत शांतता समिती सदस्य व शहारातील नागरिक सहभागी झाले होते. यावेळी वाहुतुकीच्या नियमाबाबत मार्गदर्शन करण्यात आले. लहान मुलांना वाहन चालवण्यासाठी देवू नये, दिल्यास लहान मुलाच्या वडिलांना दंड कारण्यात येईल, नागरिकांनी वहतूकीच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे, नियमाने चला, कोणीही कायद्याचे उल्लघन करू नये, अशा सूचना वाहन चालकांना पोलिसांतर्फे देण्यात आल्या.
आज गुलाबपुष्प उद्या मात्र दंड
मोटारसायकल चालकांना पोलीस निरीक्षक डॉ जयस्वाल यांनी गुलाबपुष्प देवुन त्यांचे स्वागत केले. आज गुलाबपुष्प घ्या, मात्र नियम मोडल्यास उद्या दंड भरा, असा संदेश यावेळी वाहन चालकांना देण्यात आला. मोटर सायकलने प्रवास करतांना हेल्मेट वापरावे, रोडवर वाहन चालवताना काय खबरदारी बाळगायला हवी, असे मार्गदर्शन करुन एका मोटरसायकल चालकास पोलीस स्टेशनच्यावतीने हेल्मेट देण्यात आले. उपनिरीक्षक घनशाम तांबे, पोलीस कर्मचारी पुरुषोत्तम पाटील, संदीप घ्यार, गफार तडवी, मुकेश सोनवणे, संजीव मेढे , यांच्यासह पद्माकर महाजन, सी एस पाटील, दिलीप कांबळे, गयास शेख , युनुस खान, राजेश शिंदे, डी डी वाणी, अरुण शिंदे, अशोक शिंदे, शांतता समिती सदस्य व नागरीक उपस्थित होते.