रावेर आगाराच्या बऱ्हाणपूर- सुरत बसच्या चाकाखाली आल्याने महिला गंभीर : नागरिकांनी महिलेला जळगावला हलवले

बसमध्ये चढण्यावेळी घडला अपघात

रावेर आगाराच्या बऱ्हाणपूर- सुरत बसच्या चाकाखाली आल्याने महिला गंभीर : नागरिकांनी महिलेला जळगावला हलवले

यावल / प्रतिनिधी

रावेर आगाराच्या बऱ्हाणपूर- सुरत बसच्या चाकाखाली आल्याने ६० वर्षिय महिला गंभीर जखमी झाल्याची घटना आज सकाळी दहा वाजता घडली आहे. या महिलेला नागरिकांनी तातडीने उपचारासाठी जळगावच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात दखल करण्यात आले आहे.

रावेर आगाराची बस क्रमांक MH-20-BL-3397 बऱ्हाणपूरवरून सुरतकडे जाणारी बस किनगाव ता यावल येथील बसस्थानकावर आल्यावर हि बस थांबण्यापूर्वीच बसमध्ये चढण्यासाठी प्रवाशांनी गर्दी केली. या गर्दीत कमलबाई रामराव पाटील रा अहमदाबाद (गुजरात) हि ६० वर्षीय महिला प्रवाशी बसच्या मागील चाकाखाली आल्याने खाली पडली. त्याचवेळी बसचे मागील चाक या महिलेच्या दोन्ही पायावरून गेल्याने झालेल्या अपघातात सदर महीला गंभीर जखमी झाली आहे. हा अपघात आज सकाळी दहा वाजता घडला. जखमी महिलेला नागरिकांनी तातडीने जळगावच्या शासकीय जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी रवाना केले असून अपघातग्रस्त महिलेची प्रकृती गंभीर आहे. बस किनगाव बस स्थानकावर थांबून आहे. यावल पोलिसांना नागरिकांनी या अपघाताची माहिती दिली आहे.