BIG BREKING : रावेर बाजार समिती सभापती व उपसभापती विरुद्ध अविश्वास ठराव मंजूर : हे कारण देत सभापती, उपसभापतींचा राजीनामा
सभेला सभपती, उपसभापतींसह चौघे गैरहजर
प्रतिनिधी/रावेर
येथील कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सचिन पाटील व उपसभापती योगेश पाटील यांच्याविरुद्ध संचालकांनी दाखल केलेला अविश्वास ठराव आज बाजार समितीच्या सभागृहात झालेल्या विशेष सभेत एकमताने हात उंचावून मंजूर केला. सभापती सचिन पाटील, उपसभापती योगेश पाटील, संचालक योगीराज पाटील व सय्यद असगर हे चौघे संचालक सभेला गैरहजर राहिले. त्यामुळे १४ विरुद्ध ० असा ठराव मंजूर झाल्याचे पीठासन अधिकारी सहाय्यक निबंधक जे बी बारी यांनी सांगितले. दरम्यान सभेला काही मिनिटांचा अवधी शिल्लक असताना सभापती व उप सभापतींनी त्यांच्या पदाचे राजीनामे जिल्हा उपनिबंधकाकडे सादर केले. मात्र त्याचा कोणताही परिणाम सभेच्या कामकाजावर झाला नाही.
येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या बारा संचालकांनी ११ सप्टेबरला जिल्हाधिकाऱ्यांकडे संचालक प्रल्हाद पाटील यांच्या नेतृत्वाखाली अविश्वास प्रस्ताव दाखल केला होता. त्यामुळे रावेर तालुक्यात राजकीय भूकंप झाला होता. या प्रस्तावाची पडताळणी करण्यासाठी आज बाजार समितीत विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी संचालक प्रल्हाद पाटील, डॉ राजेंद्र पाटील,मंदार पाटील, राजेंद्र चौधरी, पंकज पाटील, पितांबर पाटील, जयेश कुयटे, गणेश महाजन, पांडुरंग पाटील, सिकंदर तडवी, रोहित अग्रवाल, विलास चौधरी, सौ सविता पाटील व सौ मनीषा पाटील असे एकूण १४ संचालक हजर होते. तर सभापती सचिन पाटील उप सभापती योगेश पाटील, संचालक योगीराज पाटील, व सय्यद असगर हे चौघे गैरहजर होते.
अविश्वास प्रस्ताव दाखल केल्यानंतर सर्व संचालक जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष नंदकिशोर महाजन यांच्या नेतृत्वात सहलीवर गेले होते. आज सकाळी पावणे अकरा वाजता श्री महाजन यांच्यासह दोन गाड्यामधून १४ संचालक बाजार समितीत दाखल झाले. अविश्वास प्रस्तवावर पडताळणी होऊन अविश्वास ठराव १४ विरुद्ध ० मताने मंजूर करण्यात आला. दरम्यान आज सकाळी सभेला काही मिनिटे शिल्लक असताना सभापती व उपसभापतींनी पदाचे राजीनामे जिल्हा उप निबंधकांकडे दिले. मात्र सभेच्या वेळेपर्यंत पीठासन अधिकाऱ्यांना याची माहिती नसल्याने नियमानुसार अविश्वास पडताळणी करण्यात आली. तसेच राजीनाम्यचा विषय विशेष सभेच्या अजेंड्यावर नसल्याने या विषयावर कोणतीही चर्चा झाली नाही. अविश्वास ठराव मंजूर झाल्यानंतर माजी आमदार अरुण पाटील, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष नंदकिशोर महाजन यांच्यासह तालुक्यातील शेतकरी, नागरिकांनी संचालकांचे अभिनंदन केले.
“हे” करण देत अखेर राजीनामा
सभापती सचिन पाटील व उपसभापती योगेश पाटील यांनी अविश्वास प्रस्तावासाठी आयोजित केलेल्या सभेला अवघी काही मिनिटे शिल्लक असताना पदाचे राजीनामे जिल्हा उपनिबंधाकाकडे दिले आहेत. माझ्या वैयक्तिक कामामुळे मी सभापती पदाला वेळ देऊ शकत नसल्याचे कारण सभापती सचिन पाटील यांनी राजीनाम्यात दिले आहे.
मुजोरशाही कारभाराला चाप : डॉ राजेंद्र पाटील
इल्या अडीच वर्षाच्या कार्यकाळात बाजार समितीत मुजोरशाही चा कारभार सुरु होता. संचालकांचा अवमान केला जात होता. यामुळे संचालकांमध्ये तीव्र संताप होता. मुजोरशाही कारभारामुळे हा उद्रेक झाला असून यामुळे याला चाप बसला आहे अशी प्रतिक्रिया अविश्वास ठराव मंजूर झाल्यावर जेष्ठ संचालक डॉ राजेंद्र पाटील यांनी दिली.

krushisewak 
