POZITIVE NEWS : गावाच्या विकासासाठी 70 लाखाची देणगी देणाऱ्या उद्योजक आर एस पाटील यांच्यात दातृत्वाचे संस्कार : माजी आमदार शिरीष चौधरी
मोरगावला जे के पाटील वेलफेअर सोसायटीतर्फे भव्य बहुउद्देशीय सभागृहाचे भूमिपूजन
प्रतिनिधी/ रावेर
बालपणी आईवडिलांकडून दातृत्वाचे संस्कार मोरगावचे उद्योजक आर एस पाटील यांच्यावर झालेले असल्याने याच भावनेतून त्यांनी श्री जे के पाटील पब्लिक वेलफेअर सोसायटीच्या माध्यमातून गावासाठी 70 लाख रुपये खर्चून श्री जे के पाटील बहुउद्देशीय सभागृहाचे बांधकाम करण्याचा निर्णय घेतला. या सभागृहाचे भूमिपूजन व कोनशीला अनावरण कार्यक्रमाच्या आयोजित कार्यक्रमात माजी आमदार शिरीष चौधरी अध्यक्षस्थानावरून मार्गदर्शन करताना बोलत होते.
श्री जे के पाटील बहुउद्देशीय सभागृहाचे भूमिपूजन खंडवा लोकसभा मतदार संघांचे खासदार ज्ञानेश्वर पाटील यांच्या हस्ते झाले. यावेळी व्यासपीठावर आमदार चंद्रकांत पाटील, माजी खासदार डॉ उल्हास पाटील, माजी आमदार अरुण पाटील, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ रंजना पाटील, मराठा समाज विकास मंडळाचे अध्यक्ष राहुल पंडीत, माजी अध्यक्ष डॉ एस आर पाटील, यु डी पाटील, योगीराज पाटील, डॉ राजेंद्र पाटील, प्रल्हाद पाटील, वाय व्ही पाटील, कडू पाटील, दिलीप पाटील, डॉ संदीप पाटील, उद्योजक श्रीराम पाटील, कर्नल उत्तम पाटील, धनंजय चौधरी, शीतल पाटील, सुनील महाजन, सरपंच जे आर पाटील, एड ए जे पाटील, रमेश पाटील, सूर्यकांत देशमुख, राजन लासुरकर, प्रकाश कोचूरकर, राजेंद्र चौधरी, ग्रामसेवक भालेराव, डॉ पी जी पाटील यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात प्रतिमा पूजन व दीप प्रज्वलन करून करण्यात आली. आयोजकांतर्फे मान्यवरांचे शाल व पुष्पगुछ देऊन स्वागत करण्यात आले.यावेळी मार्गदर्शन करताना माजी आमदार चौधरी यांनी गावच्या विकासासाठी प्रत्येकाचा सहभाग महत्वाचा असल्याचे सांगितले. कार्यक्रमास सी एस पाटील, राजू सवरणे, व्ही व्ही पाटील, प्रशांत पाटील, नितीन पाटील यांच्यासह गावातील विविध संस्थांचे पदाधिकारी, व ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन एस डी पाटील यांनी केले. यावेळी ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांचा सामूहिक सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.
मातीचे ऋण फेडण्याचा प्रयत्न : अरुण पाटील
उद्योजक आर एस पाटील यांच्यामध्ये गावाचे आपण देणं लागतो ही भावना आहे. स्वतःच्या उद्योगात व्यस्त असूनही त्यांनी गावाच्या विकासासाठी सढळ हाताने निधी उपलब्ध करून दिला आहे. मोरगावमध्ये उभारल्या जाणाऱ्या श्री जे के पाटील बहुउद्देशीय सभागृहासाठी त्यांनी 70 लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. ही गावासाठी त्यांच्यात असलेली समर्पणाची भावना दिसून येते. यनिमित्ताने त्यांनी मातीचे ऋण फेडण्याचा प्रयत्न केला असल्याचे प्रतिपादन माजी आमदार अरुण पाटील यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना केले. यावेळी खासदार ज्ञानेश्वर पाटील यांनी ग्रामपंचायतीने राबविलेल्या विविध योजनाचे कौतुक करीत ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांचे त्यांनी अभिनंदन केले. माजी खासदार डॉ उल्हास पाटील यांनी बहुउद्देशीय सभागृहाचा गावच्या विकासासाठी वापर व्हावा असे आवाहन करीत उद्योजक आर एस पाटील व त्यांच्यातील जुन्या मैत्रीतील आठवणीना उजाळा दिला.
पित्याच्या स्वप्नपूर्तीचा प्रयत्न : उद्योजक आर एस पाटील
माझ्या वडिलांनी मोरगाव आदर्श गाव व्हावे असे स्वप्न पाहिले होते. शेतकऱ्यांसाठी मुबलक पाणी व्यवस्था, सर्वांना एकत्र अणणारे व समाज हिताचा विचार व्यक्त करणारे सामाजिक भवन, याशिवाय इतर बाबतीत गावाने स्वयंपूर्ण व्हावे ही त्यांची इच्छा होती. जे के पाटील ट्रस्टच्या माध्यमातून आईवडिलांची स्वप्नपूर्ती करण्याचा आमचा हा प्रयत्न आहे. गावाच्या विकासासाठी जे काही करणे शक्य आहे त्या गोष्टी ट्रस्टच्या माध्यमातून पूर्ण करण्याचा माझा प्रयत्न राहील असा विश्वास उद्योजक आर एस पाटील यांनी यावेळी मनोगत व्यक्त करताना केला.
स्व हरिभाऊ जावळे यांची आठवण
माजी खासदार स्व हरिभाऊ जावळे यांचा उल्लेख करीत त्यांनी मोरगावच्या विकासासाठी दिलेले योगदान मोठे होते. त्यांनी गावाच्या विकासासाठी त्यावेळी 12 लाखांचा निधी दिला होता असे उद्योजक आर एस पाटील मनोगत व्यक्त करताना सांगितले. तसेच तत्कालीन खासदार रक्षा खडसे, माजी आमदार अरुण पाटील, माजी आमदार शिरीष चौधरी यांनी गावाच्या विकासाला हातभार लावला आहे.

krushisewak 
