रावेरला तेली समाजातर्फे संत संताजी जगनाडे महाराजांच्या मूर्तीची भव्य शोभायात्रा : त्रिगुणात्मक तेल घाण्याचा प्रतीकात्मक देखावा मिरवणुकीचे ठरले आकर्षण
विविध कार्यक्रंमानी पुण्यतिथी साजरी

प्रतिनिधी / रावेर
तेली समाजाचे अराध्य दैवत संत शिरोमणी प.पु.संत श्री. संताजी जगनाडे महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त तेली समाजातर्फे महाराजांच्या मूर्तीची पालखीतून शहरात प्रमुख मार्गावरून भव्य शोभायात्रा काढण्यात आली. टाळ मृदुंगाच्या व विठु नामाच्या गजराने भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते. संताजी जगनाडे महाराज यांचा त्रिगुणात्मक तेल घाण्याचा प्रतिकात्मक देखावा मिरवणुकीचे आकर्षण ठरले. या वेळी समाज बांधव व भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
येथील तेली समाज नियोजीत मंगल कार्यालय जागा, राजे छत्रपती शिवाजी चौक, श्रीकृष्ण गौशाळे जवळुन संताजी महाराज यांच्या मूर्तीचे पूजन करून सजविलेल्या पालखीतुन भव्य मिरवणुक काढण्यात आली. मिरवणुकीच्या अग्रभागी विवरे येथील महिला भजनी मंडळ होते. शहरातील राजे छत्रपती शिवाजी महाराज चौक, भोई वाडा, महात्मा गांधी चौक, डाॅ हेडगेवार (चौराहा) चौक, मेन रोड, महाराजा अग्रसेन महाराज चौक, पाराचा गणपती, विखे चौक, राजे छत्रपति शिवाजी महाराज चौक, तेली समाज नियोजीत मंगल कार्यालय जागा येथे सांगता झाली. या नंतर आयोजित कार्यक्रमा प्रसंगी उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. तसेच क्रिडा व अन्य क्षेत्रात प्राविण्य मिळविलेल्या विद्यार्थ्यांचा विशेष सत्कार करण्यात आला. यावेळी उपस्थित मान्यवर दत्तु चौधरी जळगाव, अशोक चौधरी भुसावल, राजेंद्र चौधरी वरणगाव, गोपाल चौधरी किनगाव, यांचेसह परिसरातील मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमात संत संताजी जगनाडे महाराज यांच्या चरित्र माहितीचा विशेषांक मान्यवरांच्या हस्ते प्रकाशित करण्यात आला. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन चंद्रकांत चौधरी यांनी केले. कार्यक्रमानंतर तिर्थप्रसाद व महाप्रसादाचा कार्यक्रम संपन्न झाला. या वेळी अध्यक्ष सुभाष चौधरी, उपाध्यक्ष हिरामण चौधरी, कार्याध्यक्ष अनिल चौधरी, सचिव संजय चौधरी, सहसचिव चंद्रकांत चौधरी, खजिनदार ज्ञानेश्वर चौधरी, संजय चौधरी, भुषण महाजन, सुनील चौधरी, राजेंद्र चौधरी, अंबादास चौधरी, शांताराम चौधरी, दिनेश चौधरी, संतोष चौधरी, भगवान चौधरी, लिलाचंद चौधरी, भागवत चौधरी, विलास चौधरी, नारायण चौधरी, अशोक चौधरी, विनोद चौधरी, पंकज चौधरी, किरण चौधरी, गणेश चौधरी, बंटी चौधरी, अमोल कासार, यांच्यासह समाज बांधव उपस्थित होते.