कृषीसेवकची दखल : खतांचा साठा व विक्रीत तफावत आढळल्यास खत विक्रेत्यांवर कारवाई ; खतांच्या विक्रीच्या नोंदी व प्रत्यक्ष साठा तपासणीचे आदेश : कृषी आयुक्त
खतांचा काळाबाजार रोखण्यासाठी कृषी विभागाचे पाऊल

प्रतिनिधी / रावेर
रावेर तालुक्यात मोठ्या प्रमाणावर खतांची लिंकिंगद्वारे विक्री केली जात असल्याच्या शेतकऱ्यांच्या तक्रारी आहेत. तसेच रजिस्टरवर साठा शिल्लक दिसत असताना गोडावूनमध्ये मात्र खताचा दाणा शिल्लक नसल्याची वस्तुस्थिती आहे. याची तपासणीची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. याबाबतचे वृत्त साप्ताहिक कृषीसेवक मधून प्रकाशित होताच कृषी आयुक्त सुरज मांढरे यांनी दखल घेतली आहे. राज्यातील खत दुकानातील विक्रीच्या नोंदी व प्रत्यक्ष असलेला साठा तपासणीचे आदेश दिले आहेत. दरम्यान विक्रीच्या नोंदी व प्रत्यक्ष असलेला साठा यात तफावत आढळल्यास अशा खत विक्रेत्यांवर कारवाई करण्याचे आदेश निविष्ठा व गुण नियंत्रक विभागाचे संचालक अशोक किरनळी यांनी क्षेत्रीय स्तरावरील खत निरीक्षकांना दिले आहेत.
खरीप हंगाम सुरु असून खतांची पिकांना मोठ्या प्रमाणात गरज आहे. तसेच केळीसाठी युरिया पोटाश डीएपी यासारख्या खतांची आवशकता आहे, मात्र रावेर तालुक्यात शेतकऱ्यांची गरज ओळखून काही खत विक्रेते लिंकिंग पद्धतीने खतांची विक्री करीत असल्याच्या शेतकऱ्यांच्या तक्रारी आहेत. तर लिंकिंग पद्धतीने खत न घेणाऱ्या शेतकऱ्यांना खत उपलब्ध करून दिले जात नाही. मात्र प्रत्यक्षात वस्तुस्थिती वेगळीच आहे. रजिस्टरवर खतांचा साठा मोठ्या प्रमाणावर दिसत असताना दुकानात मात्र खताचा दाणा शिल्लक नाही.
कृषी आयुक्तांचे कारवाईचे आदेश
या प्रकाराची कृषी आयुक्त सुरज मांढरे यांनी दखल घेतली असून खत दुकानातील विक्रीच्या नोंदी व प्रत्यक्ष साठा तपासणीचे आदेश दिले असून विक्री व साठ्यात तफावत आढळल्यास संबधित खत विक्रेत्यांवर कडक कारवाई करण्यात येणार आहे. खत विक्रेत्यांनी अनुदानित रासायनिक खतांची विक्री ई पॉस प्रणालीच्या माध्यमातून करणे बंधनकारक आहे. खत विक्रीचे व्यवहार तत्काळ व अचूक पद्धतीने या प्रणालीमध्ये नोद्विने अत्यावशक आहे. ई पॉस मधील साठा व प्रत्यक्ष साठा यातील आकडे सारखे असयला हवेत अशी माहिती निविष्ठा व गुण नियंत्रण विभागाचे संचालक अशोक किरनळी यांनी दिली.