डीजेला परवानगी नाहीच ; उल्लंघन केल्यास कारवाई : पोलीस निरीक्षक डॉ विशाल जयस्वाल

रावेरला शांतता समितीच्या बैठकीत इशारा

डीजेला परवानगी नाहीच ; उल्लंघन केल्यास कारवाई : पोलीस निरीक्षक डॉ विशाल जयस्वाल

प्रतिनिधी / रावेर 

आगामी काळात येणाऱ्या सण उत्सवाच्या मिरवणुकांमध्ये डीजेला परवानगी नसून याचे उल्लंघन केल्यास संबंधितांवर कडक कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा पोलीस निरीक्षक डॉ विशाल जयस्वाल यांनी दिला आहे. आगामी काळात असलेल्या साजऱ्या होणाऱ्या सण, उत्सवाच्या पार्श्वभूमीवर येथील पोलीस ठाण्यात शांतता समितीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना बोलत होते. यावेळी एपीआय गणेश धुमाळ, पीएसआय सचिन नवले, पीएसआय तुषार पाटील, पीएसआय प्रिया वसावे पीएसआय राजेंद्र करोडपती, गोपनीय शाखेचे कर्मचारी पुरुषोत्तम पाटील उपस्थित होते.  

गुरुवार पासून रमजान ईद, महात्मा ज्योतिबा फुले जयंती, डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती, श्रीराम नवमी, भगवान महावीर जयंती, हनुमान जयंती आदी सण, उत्सव साजरे होणार आहेत. या उत्सवावेळी मिरवणूक काढल्या जातात. मात्र मिरवणुकीवेळी डीजे वाजवण्याला परवानगी देण्यात येणार नाही. या नियमाचे उल्लंघन करणाऱ्याची कोणत्याही प्रकारे गय केली जाणार नाही. नियमभंग करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. मिरवणुकीत साउंड सिस्टीमला परवानगी असून शासनाने ठरवून दिलेल्या मर्यादेपेक्षा अधिक आवाज असल्यास संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात येईल असे डॉ जयस्वाल यांनी यावेळी सांगितले. यावेळी उपस्थित सदस्यांनी सूचना मांडल्या. बैठकीला माजी नगराध्यक्ष हरीश गणवाणी, दारा मोहम्मद , ज्ञानेश्वर महाजन, प्रल्हाद महाजन, पद्माकर महाजन, सोपान साहेबराव पाटील, दिलीप कांबळे, गयास शेख, युसूफ खान, दिलीप पाटील यांच्यासह शांतता समिती सदस्य उपस्थित होते. 

गरजूंना मदत करा 

मिरवणुकीवर होणारा अतिरिक्त खर्च टाळून समाजातील होतकरू गरीब विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वप्त करा, तसेच गोरगरिबांना मदत करा असे आवाहन यावेळी पोलीस निरीक्षक डॉ विशाल जयस्वाल यांनी केले.