बीड येथील प्रदर्शनात ऑवाकोडाच्या स्टोलला उपमुख्यमंत्री पवार यांची भेट

शेतकरी परमेश्वर थोरात यांचे केले अभिनंदन

बीड येथील प्रदर्शनात ऑवाकोडाच्या स्टोलला उपमुख्यमंत्री पवार यांची भेट

बीड/प्रतिनिधी

येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवनात रान भाज्यांचे प्रदर्शन लावण्यात आले होते. या प्रदर्शनास राज्याचे उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्यासह गेवराई मतदार संघाचे आमदार विजय पंडित, योगेश क्षीरसागर यांनी भेट देवून पाहणी केली. शिवणी गावातील प्रयोगशील व ऑवोकोडाचे उत्पादन घेणारे शेतकरी परमेश्वर थोरात यांचा देखील स्टॉल लावण्यात आला होता. या स्टॉलला उपमुख्यमंत्री पवार यांनी भेट देत ऑवाकोडाच्या उत्पादनाविषयी शेतकरी थोरात यांच्याकडून माहिती जाणून घेतली. शेतीत वेगळ्या पिकाचा प्रयोग करीत तो यशस्वी केल्याबद्दल श्री पवार यांनी परमेश्वर थोरात यांचे कौतुक करीत अभिनंदन केले. यावेळी कृषी सहाय्यक शिंदे उपस्थित होते.