ब्रेकिंग - केवायसीसाठी आलेल्या महिलांची स्टेट बँकेसमोर चेंगराचेंगरी : दोन महिला बेशुद्ध
लाडक्या बहिणींना रक्कम काढताना मनस्ताप
प्रतिनिधी / नंदुरबार
बँकेत केवायसीसाठी आलेल्या महिलांची चेंगराचेंगरी झाल्याने दोन महिला बेशुद्ध पाडल्याची घटना शुक्रवारी घडली आहे. मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेची रक्कम काढण्यासाठी बँकामध्ये महिलांची प्रचंड गर्दी होत आहे. तर केवायसीमुळे खाते बंद पडल्याने हि रक्कम निघत नसल्याने केवायसी करण्यासाठी महिलांनी बँकेसमोर रांगा लावल्या आहेत. चेंगराचेंगरी त बेशुद्ध पडलेल्या महिलांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हि घटना धडगाव जि नंदुरबार येथील स्टेट बँकेसमोर घडली आहे.
आज सकाळपासून बंद पडलेले खाते सुरु करण्यासाठ्गी आवशक असलेली केवायसी करण्यासाठी महिलांची पहाटेपासून या बँकेसमोर मोठी गर्दी झाली होती. त्यात दिवसभरात आणखी वाढ झाल्याने चेंगराचेंगरीचा प्रकार घडला. दोन महिलांना गुदमरल्याचा त्रास होऊ लागल्याने त्या बेशुद्ध पाडल्या. त्यांना तातडीने रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.