पालजवळ गावठी पिस्तूल जप्त : यावल तालुक्यातील सराईत गुन्हेगारास अटक

रावेर पोलिसांची कारवाई

पालजवळ गावठी पिस्तूल जप्त : यावल तालुक्यातील सराईत गुन्हेगारास अटक

प्रतिनिधी / रावेर 

मध्यप्रदेशातून पाल मार्गे महाराष्ट्रात गावठी कट्टा(पिस्तूल ) घेऊन येणाऱ्या यावल तालुक्यातील वढोदा येथील तरुणांस पोलिसांनी अटक केली असून त्याच्याकडून दहा हजार रुपये किमतीचा गावठी कट्टा जप्त करण्यात आला आहे. 

मध्यप्रदेशातून एक व्यक्ती गावठी पिस्तूल घेऊन पाल मार्गे महाराष्ट्रात येत असल्याची गुप्त माहिती पोलीस निरीक्षक डॉ विशाल जयस्वाल यांना मिळाली. त्यांनी उप निरीक्षक तुषार पाटील गुन्हे शोध पथकाचे पोलीस कर्मचारी समाधान ठाकूर, सचिन घुगे, प्रमोद पाटील, विकार शेख यांना पाल जवळील शेरी नाका येथे नाकाबंदी सुरु असलेल्या ठिकाणी पाठवले. शुक्रवारी मध्यरात्री पावणे चार वाजेच्या सुमारास एक व्यक्ती संशयस्पद स्थितीत फिरताना आढळून आला. त्याची अंगझडती घेतली असता दहा हजार रुपये किमतीचे गावठी पिस्तूल मिळून आले. हे पिस्तूल पोलिसांनी जप्त केले असून आरोपी भरत गणेश सोनवणे वय 32 रा वढोदा ता यावल जि जळगाव याला अटक करण्यात आली आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही कारवाई करण्यात आली आहे.