स्वामी विवेकानंद विद्यालयाची रावेरात भव्य दिंडी
नागरिकांचा दिंडीत सहभाग
प्रतिनिधी /रावेर
स्वामी एज्युकेशन गृपतर्फे आषाढी एकादशी आणि गुरू पोर्णिमेनिमित्त भव्य दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले.
याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून उद्योगपती कन्हैयालाल अग्रवाल, कृषी अधिकारी भाऊसाहेब वाळके , रावेर पोलीस स्टेशनचे पीएसआय तुषार पाटील, संस्थाअध्यक्ष रविंद्र पवार, संस्थेच्या सचिव सौ.मनिषा पवार, आर.के. पवार, ओ.के. पवार, पुष्पक पवार हे उपस्थित होते.
सदर दिंडीत विठ्ठल रखुमाईच्या पालखीचे, गुरूपौर्णिमेनिमित्त गुरूवंदना, पावली, संत गोरा कुंभार, विठ्ठल भक्तीवर आधारीत पथनाट्य शाळेत व गांधी चौकात सादर करण्यात आले. दिंडीचे रावेर शहरात ठिकठिकाणी नागरिकांनी, समाजसेवक, पत्रकार मंडळींनी जल्लोषात स्वागत केले. याप्रसंगी प्रामुख्याने पद्माकर महाजन, भास्कर पहिलवान, दिपक नगरे, कृष्णा पाटील यांनी विठ्ठल रखुमाईचे पूजन केले. तसेच अंबिका व्यायाम शाळा यांनी विद्यार्थ्यांसाठी पाण्याची सुविधा उपलब्ध करून दिली. सदर दिंडी अतिशय जल्लोषपूर्ण वातावरणात स्वामी विवेकानंद विद्यामंदिर शाळेपासून पोलिस स्टेशन मार्गे , श्री स्वामी समर्थ केंद्र (मोठे) , छोरीया मार्केट , गांधी चौक , हेडगेवार चौका, आंबेडकर चौकापासून पून्हा शाळेत दिंडीचे विसर्जन करण्यात आले. दिंडी यशस्वीतेसाठी सर्व विभागप्रमुख सर्व विभाग शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले