क्रीडा संकुलाचे हस्तांतरण : जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांची आमदार चौधरींकडून झापाई

आठवडाभरात हस्तातंर न झाल्यास क्रीडा मंत्र्यांकडे तक्रार करणार

क्रीडा संकुलाचे हस्तांतरण : जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांची आमदार चौधरींकडून झापाई
रावेरचे एक वर्षापासून पूर्ण झालेले क्रीडा संकुल

कृषीसेवक न्यूज नेटवर्क / रावेर 

येथील तालुका क्रीडा संकुलाचे काम पूर्ण होऊन एक वर्षापेक्षाही अधिक कालावधी उलटला आहे. मात्र जिल्हा क्रीडा अधिकारी ते  ताब्यात घेण्यासाठी दाद देत नसून यात चालढकल करीत आहेत अशी तक्रार आमदार शिरीष चौधरी यांच्याकडे करण्यात आली होती. याची दखल घेत आमदार चौधरी यांनी तात्काळ जिल्हा क्रीडा अधिकारी दिनेश दीक्षित यांना फोनवरून याबाबत माहिती विचारली असता ते समाधानकारक उत्तर देऊ शकले नाही. अखेर आमदार चौधरी यांनी या अधिकाऱ्याची चांगलीच झापाई करीत आठ दिवसात येथील क्रीडा संकुल ताब्यात न घेतल्यास क्रीडा मंत्र्यांकडे तक्रार करण्याचा इशारा दिला आहे. 

येथील क्रीडा संकुलाचे काम पूर्ण होऊन एक वर्षापेक्षाही अधिक कालावधी उलटला आहे. मात्र हे क्रीडा संकुल जिल्हा क्रीडा अधिकारी ताब्यात घेण्यात टाळाटाळ करीत असल्याची तक्रार आमदार चौधरी रावेरला तहसील कार्यालयात आले असता करण्यात आली. आमदार चौधरींनी तात्काळ जिल्हा क्रीडा अधिकारी दीक्षित याना फोन लावत याची विचारणा केली. यावेळी दीक्षित यांची आमदारांनी चांगलीच कानउघाडणी केली. येत्या आठवडाभरात क्रीडा संकुल ताब्यात न घेतल्यास विधानमंडळाच्या अधिवेशनात प्रश्न मांडण्यासह क्रीडा मंत्र्यांकडे तक्रार करण्याचा इशारा दिला आहे.