आमदार शिरीष चौधरींकडून नुकसानग्रस्त पुलांची पाहणी
पुनखेडा पुलाला संरक्षक भिंत बांधण्याच्या सूचना
कृषीसेवक न्यूज नेटवर्क / रावेर
शनिवारी तालुक्यात झालेल्या पावसाने पाच रस्त्यांवरील पुलांचे भराव पुराच्या पाण्यात वाहून गेल्याने या रस्त्यावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे. पुनखेडा पुलाजवळ तात्पुरती उपाययोजना केल्याने हा पूल वाहतुकीसाठी सुरु करण्यात आला आहे. आमदार शिरीष चौधरी यांनी या पाचही ठिकाणी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. तातडीने उपाय योजना करून वाहतूक पूर्ववत करण्याच्या सूचना त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या आहे.
तालुक्यात शनिवारी झालेल्या पावसाने भोकर व इतर नदीनाल्याना पूर आला होता. या पुरात ठिकठिकाणच्या पुलाचे भराव वाहून गेलेले आहेत. यात बोरखेडा, रावेर, अभोडा, निरुळ, पुनखेडा, पातोंडी येथील नुकसानग्रस्त पुलांची पाहणी आमदार शिरीष चौधरी यांनी केली . त्यावेळी तहसीलदार बंडू कापसे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता वाय एस कोरके, अभियंता व्ही के तायडे, एम पी चौधरी, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष डॉ राजेंद्र पाटील, बाजार समितीचे संचालक राजेंद्र चौधरी, योगेश पाटील, पीपल्स बँकेचे संचालक सोपान पाटील, संतोष पाटील यांच्यासह अधिकारी उपस्थित होते. दरम्यान पुनखेडा पुलावर तात्पुरत्या स्वरूपात उपाययोजना करीत वाहतूक सुरु करण्यात अली आहे. मात्र उर्वरित पाच पूल वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आले आहेत.
संरक्षक भिंत बांधण्याच्या सूचना
पुनखेडा येथील पुलाजवळील भराव नदीला आलेल्या पुरात वाहून गेल्याने या पुलाच्या दोन्ही बाजूनी संरक्षक भिंत बांधण्याच्या सूचना आमदार शिरीष चौधरी यांनी संबंधित अधिकाऱ्यांना यावेळी केल्या आहेत.