ऍड. सुरज चौधरी यांची नोटरीपदी नियुक्ती ; पदाचा समाजासाठी वापर करणार चौधरींचे आश्वासन

अभिनंदनाचा सर्व स्तरातून वर्षाव

ऍड. सुरज चौधरी यांची नोटरीपदी नियुक्ती ; पदाचा समाजासाठी वापर करणार चौधरींचे आश्वासन

प्रतिनिधी / रावेर 

केंद्र सरकारच्या विधी व न्याय विभागातर्फे येथील माजी उप नगराध्यक्ष ऍड. सुरज प्रकाश चौधरी यांची नोटरीपदी (भारत सरकार) नियुक्ती करण्यात आली आहे. केंद्र सरकारच्या विधी व न्याय विभागातर्फे १४ मार्चला नोटरीपदी निवड करण्यात आलेल्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्यात आली. या निवड यादीमध्ये ऍड. सुरज चौधरी यांच्या नावाचा समावेश आहे. चौधरी यांना गेल्या १८ वर्षांपासून वकिलीच्या व्यवसायाचा अनुभव आहे. तसेच ते सामाजिक कार्यात नेहमी अग्रेसर असतात. त्यांच्या या निवडीबद्दल सहकारी मित्रपरिवार, तेली समाज पंच मंडळ, विकास युवाशक्ती फाउंडेशन, कारागीर व्यायाम शाळा यासह विविध संस्थांचे तसेच संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी अभिनंदन केले आहे. मला मिळालेल्या नोटरी पदाचा आगामी काळात समाजासाठी व नागरिकांना न्याय मिळवून देण्यासाठी उ[योग्य केला जाईल असे ऍड. सुरज चौधरी यांनि सांगितले.