आरक्षण आंदोलनासाठी रावेरचे मराठा बांधव मुंबईत

आझाद मैदानावर आंदोलनात सहभागी

आरक्षण आंदोलनासाठी रावेरचे मराठा बांधव मुंबईत

प्रतिनिधी / रावेर 

मुंबई येथील आझाद मैदानावर मराठा समाजाच्या आरक्षणासाठी सुरु असलेल्या आंदोलनात रावेरचे मराठा बांधव सहभागी झाले आहेत .पहिल्याच दिवसापासून हे मराठा बांधव मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणात सहभागी झाले आहेत.

मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावे म्हणून मुंबई येथे मनोज जरांगे यांचे नेतृत्वाखाली शुक्रवारपासून आंदोलन सुरु आहे. रावेर व तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार) तालुकाध्यक्ष किशोर पाटील, घनःश्याम पाटील, प्रशांत पाटील, योगेश पाटील, गणेश चौधरी, बापु चौधरी यांचे सह आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी सहभागी झाले आहेत .