ब्रेकिंग : अतिक्रमण हटवले : सुकी धरण परिसरात वन विभागाची कारवाई
कारवाईचा वन परिक्षेत्र अधिकारी अजय बावणेंचा इशारा
प्रतिनिधी / रावेर
रावेर तालुक्यातील सुकी धरणाच्या वन क्षेत्रात झालेले ७ हेक्टरवरील अतिक्रमण वन परीक्षेत्र अधिकारी अजय बावणे यांनी काढण्याची कारवाई केली. या ठिकाणी यंत्राच्या साहाय्याने खोल चर खोदले असून अतिक्रमण करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा बावणे यांनी दिला आहे.
यावल वन क्षेत्रात येणाऱ्या सुकी धरण परिसरातील जानोरी नियत क्षेत्रात ७ हेक्टरवर अतिक्रमण करण्यात आल्याची माहिती वन अधिकाऱ्यांना मिळाली होती. त्यानुसार रावेरचे वन परिक्षेत्र अधिकारी अजय बावणे, फैजपूरचे वनपाल अतुल तायडे, वनरक्षक सुपडू सपकाळे वनमजूर सुखराम बारेला, हमीद तडवी यांच्या पथकाने अतिक्रमण काढण्याची कारवाई केली आहे.
समांतर चर खोदले, कारवाईचा इशारा
काढलेल्या अतिक्रमित जमिनीवर पुन्हा नव्याने अतिक्रमण होऊ नये म्हणून वन अधिकाऱ्यांनी दक्षता घेतली आहे. या ठिकाणी जेसीबीच्या साहाय्याने खोल समांतर चार खोदले आहेत. दरम्यान वन क्षेत्रावर वन विभागाची नजर असून कोणीही अतिक्रमण करण्याचा प्रयत्न केल्यास त्याच्याविरुद्ध कडक कायदेशीर करण्यात येईल असा इशारा वन परिक्षेत्र अधिकारी अजय बावणे यांनी दिला आहे.