शेतीतील पंढरीत उद्यापासून शेतकऱ्यांचा कृषी महोत्सव : जळगावात जैन इरिगेशनतर्फे जागतिक आधुनिक तंत्रज्ञानांचे दालन खुले : तुमच्यासाठी, तुमच्याच मातीसाठी, येणाऱ्या पिढ्यांसाठी... या... पाहा... शिका... आणि बदल घडवा...!

हायटेक शेतीचा नवा हुंकार : उद्यापासून महिनाभर चालणार कृषी महोत्सव

शेतीतील पंढरीत उद्यापासून शेतकऱ्यांचा कृषी महोत्सव : जळगावात जैन इरिगेशनतर्फे जागतिक आधुनिक तंत्रज्ञानांचे दालन खुले : तुमच्यासाठी, तुमच्याच मातीसाठी, येणाऱ्या पिढ्यांसाठी... या... पाहा... शिका... आणि बदल घडवा...!

कृष्णा पाटील / जळगाव

आधुनिक हरितक्रांतीचे जनक असलेल्या पद्मश्री स्व भवरलाल जैन यांनी शेतीतील जागतिक आधुनिक तंत्रज्ञान जळगाव येथे आणून ते येथील मातीत विकसीत केले आहे. तळागाळातल्या अल्पभूधारक शेतकऱ्यांपर्यंत हे तंत्रज्ञान पोहचले पाहिजे व यातून त्यांच्या  उत्पादनात वाढ होऊन तो आर्थिकदृष्ट्या संपन्न झाला पाहिजे ही स्व. जैन यांची भावना होती.  शेतीच्या क्षेत्रातील जागतिक आधुनिक तंत्रज्ञान जैन इरीगेशनने जळगाव येथील जैन हिल्सवर उभे केले आहे. राज्यभरातील व राज्याच्या बाहेरील शेतकऱ्यांपर्यंत हे तंत्रज्ञान पोहचून त्यांनी स्वताच्या शेतीत बदल करावा यासाठी जैन इरिगेशनचे सातत्याने प्रयत्न सुरु आहेत.  शेतकऱ्यांना नवनवीन तंत्रज्ञान, आधुनिक शेती पद्धती आणि नवीन संकल्पनांची माहिती मिळावी यासाठी जळगाव येथे शेतकऱ्यांचा कृषी महोत्सव आयोजित करण्यात आला आहे.  हे तंत्रज्ञान शेतकऱ्यांना पाहता यावे यासाठी गेल्या वर्षापासून “हायटेक शेतीचा नवा हुंकार” हा कृषी महोत्सव खास शेतकऱ्यांसाठी राबविला जात आहे.  शेतीतील पंढरीतील हे तीर्थक्षेत्रच म्हणावे लागेल.  उद्यापासून (दि १४ डिसेंबर) महिनाभर चालणारा हा महोत्सव म्हणजेच शेतकऱ्यांसाठी एक आधुनिक तंत्रज्ञानाची पर्वणीच म्हणावी लागेल. जैन इरिगेशनच्या पुढाकाराने उद्यापासून जागतिक आधुनिक तंत्रज्ञानाचे दालन शेतकऱ्यांसाठी खुले होणार आहे. एक महिनाभर हा महोत्सव सर्वांसाठी खुला राहणार आहे.

शेतीला व्यावसायिक स्वरूप दिल्याशिवाय शेतकऱ्यांची आर्थिक प्रगती शक्य होणार नाही हे ओळखून पद्मश्री स्व भवरलाल जैन यांनी जैन इरिगेशनची स्थापना केली होती. शेती क्षेत्रातील आधुनिक तंत्रज्ञान स्व. जैन यांनी जैन इरिगेशनच्या माध्यमातून शेतकऱ्यांपर्यंत पोहचविण्याचा सातत्याने प्रयत्न केला. जगभरातील शेतीतील आधुनिक तंत्रज्ञान त्यांनी जळगाव येथे आणून शेतकऱ्यांना प्रयोगाद्वारे शेतीतील तंत्रज्ञान दाखवण्यावर भर दिला. याचा लाभ राज्यातील व देशातील असंख्य शेतकऱ्यांना झाला आहे. शेतकऱ्यांचा खऱ्या अर्थाने विकास व्हायचा असेल तर शेतीला आधुनिकतेची जोड देणे गरजेचे आहे. हे ओळखून विविध पिकातील आधुनिक तंत्रज्ञान शेतकऱ्यांना उघड्या डोळ्यांनी पाहता यावे यासाठी जैन इरिगेशनतर्फे हायटेक शेतीचा नवा हुंकार या कृषी महोत्सवाचे आयोजन केले जात आहे. १४ डिसेंबरपासून या महोत्सवाला सुरुवात होत आहे. १४ जानेवारी २०२५ पर्यंत एक महिनाभर हा कृषी महोत्सव चालणार आहे.  यात शेतकऱ्यांना अत्याधुनिक तंत्रज्ञानांचा वापर करून केल्या जाणाऱ्या शेतीचे प्रयोग प्रत्यक्षात पाहण्याची संधी जैन इरिगेशनने या माध्यमातून उपलब्ध करून दिली आहे. या महोत्सवला भेट देणाऱ्या शेतकऱ्यांना शेती हि नफा मिळवून देणारी व फायद्याची होऊ शकते याचे साक्षात दर्शन या महोत्सवातून घडणार आहे. या कृषी महोत्सवात अधिकाधिक शेतकऱ्यांनी सहभागी होऊन आपल्या शेतीत बदल करीत आर्थिक प्रगती करावी. या महोत्सवात अधिकाधिक संख्येने शेतकऱ्यांनी सहभागी होऊन शेतीचे आधुनिक तंत्रज्ञान पाहावे व आत्मसात करावे. 

कृषी महोत्सवाची मुख्य वैशिष्ट्ये:

प्रदर्शनात काय पहायला मिळेल : आधुनिक सिंचन पद्धती, जलसंवर्धनाचे तंत्र, शेतीमध्ये वापरण्यासाठी नवीन यंत्रसामग्री, हरितगृह तंत्रज्ञान, आणि पीक व्यवस्थापनाचे नवकल्पनाशील उपाय.

शेतकऱ्यांसाठी कार्यशाळा : "शिका व बदल करा" या थीमखाली विविध तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली कार्यशाळांचे आयोजन.

संपर्क आणि संवाद : शेतकऱ्यांना तंत्रज्ञानाचे थेट प्रात्यक्षिक पाहण्याची आणि तज्ज्ञांशी संवाद साधण्याची संधी.

 

शेतकऱ्यांनो, या बदलाचा भाग बना...!

सर्व शेतकऱ्यांनी या मेळाव्यात सहभागी होऊन शेतीतील जागतिक आधुनिक तंत्रज्ञान स्वीकारा, शेतीत बदल घडवा. आधुनिक तंत्रज्ञान तुमची शेती फक्त सुलभच करणार नाही, तर तिची उत्पादकता वाढवून तुमचं आर्थिक स्वावलंबनही सुनिश्चित करेल. "पाणी म्हणजे सोनं" या तत्त्वावर आधारित जलसंवर्धन तंत्र, आधुनिक सिंचन प्रणाली, आणि हरितगृह पद्धती यांसारख्या उपायांमुळे तुम्ही तुमच्या भूमीत परिवर्तन घडवू शकता.”

--- अशोक जैन, अध्यक्ष जैन इरिगेशन जळगाव.