ग्रामपंचायत निवडणुकीत अपेक्षितांना धक्का तर नवख्यांची राजकारणात एंट्री
अभोड्यात सासूच्या निधनानंतर सुनेला सदस्यपदाची संधी
कृषीसेवक न्यूज नेटवर्क / रावेर
रावेर तालुक्यातील १३ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचे निकाल आज जाहीर करण्यात आले. यात काही ठिकाणी अपेक्षितांना धक्का बसला तर काहींचा ग्रामपंचायतीच्या माध्यमातून राजकारणात एंट्री झाली आहे. मतदानाच्या दिवशी हृदय विकाराचा झटका आलेल्या उटखेडा ग्रामपंचायतीतील महिला उमेदवार अरुणा महाजन यांना मतदारांनी विजयी केले आहे. तर याच ग्रामपंचायतीत महिला उमेदवार नलूबाई धनगर यांचा अवघ्या एका मताने विजय झाला आहे. जिन्सी गृप ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणुकीत ममता पवार या त्यांच्या सासूच्या जागेवर विजयी झाल्या आहेत. ममता पवार यांच्या सासू सदस्य होत्या मात्र त्यांच्या निधनामुळे हि जागा रिक्त झाल्याने येथे या जागेसाठी पोटनिवडणूक घेण्यात आली .
सोमवारी सकाळी दहा वाजता तहसील कार्यालयात तहसीलदार बी ए कापसे, निवासी नायब तहसीलदार संजय तायडे यांच्या निरीक्षणाखाली मतमोजणीला प्रारंभ झाला. मतमोजणी केंद्रात व परिसरात पोलिस निरीक्षक कैलास नागरे यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय सचिन नवले, तुषार पाटील व कर्मचाऱ्यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. चिनावल, उटखेडा, कळमोदा, खिर्डी बुद्रुक, रोझोदा, थेरोळा या गावातील सरपंच पदासाठी अतिशय अटीतटीची व चुरशीची निवडणूक झाली हॊती. एकूण सहा फेऱ्यांमध्ये मतमोजणी झाली. तर माघारीनंतर निवडणूक होणाऱ्या ग्रामपंचायतीत अनेक सदस्य बिनविरोध निवडून आलेले आहेत. निवडणूक झालेल्या ग्रामपंचायत निहाय विजयी सरपंच व सदस्य पुढीलप्रमाणे :
उटखेडा ग्रामपंचायत :
सरपंच - कुंदन सुरेश महाजन, सदस्य - सुधाकर गोविंदा पाटील, नलूबाई इच्छाराम धनगर, महेंद्र सुधाकर महाजन, चंद्रभागा अरुण तायडे, अरुणा हरिश्चंद्र महाजन, जुगाराबाई इदू तडवी वैशाली जितेंद्र चौधरी
चिनावल ग्रामपंचायत :
सरपंच - ज्योती संजय भालेराव सदस्य - प्रियंका मोहन पाटील, प्रियंका कुंदन बोरोले, ठकसेन भास्कर पाटील, अंजली नितीन भालेराव, सागर नीलकंठ चौधरी, जितेंद्र सोनजी नेमाडे, शेषराज दिनकर भालेराव , कविता गिरीश नारखेडे, सागर गोपाळ भारंबे
खिर्डी बुद्रुक ग्रामपंचायत :
सरपंच - संगीता भास्कर पाटील, सदस्य - शेख शकील शेख बशीर, निता रवींद्र कोचुरे, वहिदाबी रऊफ खाटीक, महेंद्र मधुकर कोचुरे, धीरेंद्र सुभाष पाटील, अतुल प्रभाकर पाटील, सुवर्णा चंद्रजीत पाटील, गणेश मनोहर देवगिरकर, ज्योती ज्ञानेश्वर बोन्डारे, देवकाबाई सीताराम महाजन,
कळमोदा ग्रामपंचायत :
सरपंच - प्रशांत हरिचंद्र जावळे, सदस्य- राजू नसिर तडवी, रुपाली पकंज वाघ, पल्लवी योगेश बोन्डे, कुर्बान नामदार तडवी, योगेश भगवान जावळे, शबाना तडवी, नरेश रामकृष्ण पाटील, तायरा अमित तडवी, शहानुर तडवी
रोझोदा ग्रामपंचायत
सरपंच पुष्कर लक्ष्मण फेगडे, सदस्य - चेतन पंडित भारंबे, आम्रपाली रवींद्र मेढे, खिलचंद सुपडू धांडे, पूजा मयूर कोल्हे, सुनीता गणेश कोळी, गिरीश कमलाकर पाटील, प्रियंका पुष्कर फेगडे नारायण विष्णू राणे, निखिल सुभाष सरोदे, भावना अमोल धांडे,
विटावा- सांगावे गृप ग्रामपंचायत
सरपंच - मुकेश विश्वनाथ चौधरी , सदस्य- गणेश मधुकर मनुरे, रुपाली गजानन कोळी, सुशिलाबाई लक्ष्मण मनुरे, साहेबराव विकास वानखेडे, निर्मला सुरेश कोळी
अभोडा ग्रामपंचायत
सरपंच- अल्लाउद्दीन हैदर तडवी,, सदस्य- महेमूद सिकंदर तडवी, फातिमा कादर तडवी, लायाबाई धनराज पवार, विनोद भागवत तायडे, अपशान दिलदार तडवी, जोहराबाई रहेमान तडवी, चांदखा मैबुब तडवी, ईश्वर छगन पवार, जरीना जुम्मा तडवी
मांगी चुनवाडे ग्रामपंचायत
सरपंच -ईश्वर अशोक कोळी सदस्य - मुरलीधर रामदास पाटील, दीपाली निलेश कोळी, अर्चना योगेश कोळी, विकास सुरेश पाटील, वैशाली ज्ञानेश्वर कोळी, पवन एकनाथ तायडे
आंदळवाडी ग्रामपंचायत
सरपंच - विनायक दुर्योधन कोळी, सदस्य रत्नमाला दिलीप तायडे, कडू वाघो तायडे, प्रतिभा सूर्यभान तायडे.
शिंगाडी ग्रामपंचायत
सरपंच - दीपक धर्मराजक सोनवणे, सदस्य सीमा भूषण कोळी रामचंद्र बालचंद चऱ्हाटे
थेरोळा ग्रामपंचायत
सरपंच - शुभम पुंडलिक पाटील, सदस्य -ईश्वर भागवत अटकाळे, अशोक भास्कर पाटील, अनुसया वसंत अटकाळे
वाघोदा खुर्द ग्रामपंचायत
सरपंच - दीपाली जितेंद्र चौधरी, सदस्य - पिरान हसन कुलकर्णी, जितेंद्र सुरेश चौधरी, वंदना दिलीप कोलते, संदीप रामकृष्ण कोलते, सत्तर तुराबी पटेल,
रायपूर ग्रामपंचायत
सद्स्य - यशवंत सदाशिव तायडे प्रकाश लक्ष्मण पाटील, अनिल उखर्डू तायडे कोचुर खुर्द