रावेरला ७ जानेवारीला कृषीसेवक पुरस्कार सन्मान सोहळा : प्रेरणा देणारी श्रद्धेय भवरलाल जैन यांची पुस्तके पुरस्कारार्थींना दिली जाणार भेट
राज्यभरातील ३१ जणांचा होणार गौरव
कृषीसेवक न्यूज नेटवर्क/रावेर
शेती व शेतीशी संबंधित क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या भूमिपुत्रांच्या गौरव सोहळ्याचे ७ जानेवारीला रावेर येथे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी महाराष्ट्रातील ३१ जणांना राज्यस्तरीय कृषीसेवक पुरस्कार व जिवनात सातत्याने प्रेरणा देणारी जैन इरिगेशनचे संस्थापक श्रद्धेय स्व. भवरलाल जैन यांची पुस्तके भेट देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.
हा सन्मान सोहळा रावेर येथील स्टेशन रोडवरील कै. श्रीमती शेनाबाई गोंडू पंडीत मराठा समाज मंगल कार्यालयात सकाळी अकरा वाजता संपन्न होत आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी महसूल व कृषी मंत्री आ. एकनाथराव खडसे असतील. सोहळ्याचे उद्घाटन माजी आमदार अरूण पाटील करणार असून पुरस्कार वितरण माजी कृषी राज्यमंत्री आ. सदाभाऊ खोत यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. नांगर पूजन जैन इरिगेशनचे व्यवस्थापकीय संचालक अजित जैन यांच्या हस्ते होईल. तर गौरव विशेषांकाचे प्रकाशन खासदार रक्षा खडसे व आमदार शिरीष चौधरी यावेळी करतील. कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून माजी खासदार डॉ उल्हास पाटील, पुणे माफदा संघटनेचे राज्याध्यक्ष विनोद तराळ, मुख्याध्यापक महामंडळ राज्याध्यक्ष जे के पाटील, भाजपा प्रदेश उपाध्यक्ष सुरेश धनके, जिल्हा कृषी अधीक्षक आर बी चलवदे, जेष्ठ केळी तज्ज्ञ व जैन इरिगेशनचे उपाध्यक्ष के बी पाटील, माजी कृषी सहसंचालक अनिल भोकरे, भाजप जिल्हाध्यक्ष अमोल जावळे, ड्रीप असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष सोपान पाटील, भाजप महिला जिल्हाध्यक्ष सौ. रंजना पाटील, शिवसेना जिल्हा उपप्रमुख योगीराज पाटील, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष नंदकिशोर महाजन, तहसीलदार बी ए कापसे, सहायक पोलीस निरीक्षक गणेश अडसूळ, तालुका कृषी अधिकारी भाऊसाहेब वाळके, उद्योजक डॉ प्रशांत सरोदे, उद्योजक श्रीराम पाटील, उद्योजक अमित भारंबे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सचिन पाटील, मराठा समाज विकास मंडळ अध्यक्ष राहुल पंडीत, बाजार समितीचे माजी सभापती श्रीकांत महाजन, माजी नगराध्यक्ष हरीश गणवाणी, फैजपुरचे माजी नगराध्यक्ष पांडूरंग सराफ, माजी नगराध्यक्ष पद्माकर महाजन,माउली फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ संदीप पाटील, दत्तछाया फाउंडेशनचे अध्यक्ष राजेंद्र चौधरी, रावेर तालुका ऍग्रो डीलर असोसिएशनचे अध्यक्ष सुनील कोंडे, प्रगतिशील शेतकरी विशाल अग्रवाल, जळगाव ऍग्रो प्रोड्युसर कंपनीचे सीईओ सी एस पाटील यांच्यासह मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
प्रेरणदायी पुस्तक देणार भेट
पाणी बचत व संवर्धनाचे महत्व शेतकऱ्यांना पटवून देत अधिकाधिक क्षेत्र सिंचनाखाली आणण्याचा मार्ग दाखविणारे जैन इरिगेशनचे संस्थापक स्व भवरलाल जैन यांची मानवाला सतत प्रेरणा देणारी पुस्तक पुरस्कारार्थींना भेट दिली जाणार असल्याची माहिती कृषीसेवकचे संपादक कृष्णा पाटील व सहयोगी संपादक अनंत बागुल यांनी दिली आहे.
--