BREAKING : पावणे दोन लाखांच्या सोन्याचांदीच्या चोरीचा 12 तासात छडा : रावेर पोलिसांची कामगिरी
आरोपी महिलेवर कायदेशीर कारवाई
प्रतिनिधी/रावेर
रावेर पोलिस स्टेशन हद्दीत मेंढपाल खंडु भिका सरगर रा. ब-हाणपुर यांनी वत्सलाबाई रामदास पाटील रा. नेहता यांच्या शेतात मेंढया बसवलेल्या होत्या. नेहता शिवरात त्यांनी त्यांचा संसारपयोगी सामान, सोने चांदी चे दागीने हे बैलगाडीवर पेटीमध्ये सुरक्षित ठेवलेले होते. परंतु कोणीतरी अज्ञात व्यक्तीने ते चोरुन नेल्याने त्याची पोलिसात तक्रार करण्यात आली होती. याप्रकारणी गुन्हा दाखल करण्यात आला होता.
पोलिस निरीक्षक डॉ विशाल जयस्वाल यांनी गुन्हे शोध पथक तसेच बिट अमंलदार यांना तात्काळ सुचना करीत तपासाला गती दिली. परंतु सदर घटनास्थळ हे शेतशिवार असल्याने तेथे तांत्रिक तपासाला अडचण येत होती. त्यावेळी घटनास्थळी असलेले प्रत्यक्ष साक्षीदार यांच्याकडे तपास करण्यात आल्यावरुन एक महीला सदर घटनास्थळी संशयीतरित्या फिरत असल्याची माहीती बिट अमंलदार यांना मिळाली. मात्र ही महीला कोण होती ? हे समजुन येत नव्हते. परंतु मिळालेल्या माहितीच्या आधारे सदर महीलेची ओळख पटविण्यात आली. सुरुवातीला या महिलेने उडवाउडवीचे उत्तरे देली मात्र तिला विश्वासात घेवुन विचारपूस केल्यावर सदर महीलेने गुन्हयाची कबुली देवुन चोरलेला मुद्देमाल काढून दिला. सदर संशयीत महीलेकडून 1,42,500 रुपये किमतीचे महीलांचे हातातील 995 ग्रॅम वजनावे 3 चांदीचे कडे व 30,000/- रु किमतीचे 3 ग्रॅम वजनाची कानातील सोन्याची बाही असा चोरीस गेलेला मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे. सदर महीलेवर कायदेशील कारवाई करण्यात आलेली आहे.
सदर कार्यवाही पो. नि.डॉ विशाल जयस्वाल यांच्या मार्गदर्शनाखाली पो.हे.कॉ विजय चौधरी, पो.कॉ. विक्रम सिसोदे, वैतन्य नारखेडे, रुबाब तडवी, गुन्हे शोध पथकातील प्रमोद पाटील, श्रीकांत चव्हाण, विशाल पाटील, सुकेश तडवी, गजानन बोने यांनी केला आहे. सदर गुन्हयाचा पुढील तपास पो. हे. कों विजय चौधरी हे करीत आहेत.

krushisewak 
