कृषी उत्पादनांची गुणवत्ता व दर्जा अबाधित राहण्यासाठी आता राष्ट्रीय कृषी संहिता
कृषी संहिता तयार करण्याचे काम सुरु
नवी दिल्ली : भारतीय कृषी उत्पादनांची मानकं ठरवण्यात यावी यासाठी आणि गुणवत्ता, दर्जा अबाधित राहावा यासाठी पाऊलं टाकण्यात आली आहे. त्यासाठी राष्ट्रीय कृषी संहिता (National Agriculture Code) तयार करण्यात येत आहे.
भारतातील मसाल्यांमध्ये कीटकनाशक दिसून आल्याची जगात चर्चा झाल्यावर त्यांनतर अनेक देशांमध्ये भारतीय मसाल्यांवर बंदी घालण्यात आली. अनेक मोठ्या ब्रँड्सची नाचक्की झाली. जगभरात लोकप्रिय असलेल्या भारतीय मसाल्यांबाबत साशंकता वाढली. या कंपन्यांवर कारवाईनंतर केंद्र सरकारने शेतीसंबंधीच्या अनेक उत्पादनांना रसायनमुक्त करण्याचा आणि त्यांची गुणवत्ता वाढीसंबंधी मोठा निर्णय घेतला.
राष्ट्रीय कृषी संहितेचे काम सुरु
देशात वस्तू, उत्पादन आणि प्रक्रिया याची गुणवत्ता ठरवण्याचे काम भारतीय मानक ब्युरोकडे (BIS) आहे. सोन्यापासून ते तलम आणि इलेक्ट्रॉनिक वस्तूंसह इतर अनेक उत्पादनाची गुणवत्ता सिद्ध करण्यासाठी त्यावर ‘हॉलमार्किंग’ आणि ‘स्टार रेटिंग’ देण्यात येते. त्याआधारे त्या त्या वस्तूची गुणवत्ता, दर्जाची हमी सरकार घेते. आता त्याच धरतीवर बीआयएस कृषी उत्पादनांसाठी राष्ट्रीय कृषी संहिता तयार करत आहे. भारतीय मानक ब्युरो कृषी क्षेत्रातील गुणवत्ता आणि सर्वोत्तम दर्जा वाढीसाठी राष्ट्रीय कृषी संहिता विकसीत करणार आहे. हा कोड विकसीत झाल्यानंतर त्या त्या क्षेत्रातील उत्पादनांना एक कोड आणि ओळख देण्यात येईल. ज्या भागात उत्पादनाची गुणवत्ता घसरलेली आहे, दर्जा कमी झालेला आहे. तिथे गुणवत्ता वाढीसाठी चालना देण्यात येईल. त्याठिकाणी विविध प्रयोग करण्यात येतील. आता या संस्थेवर कृषीसंबंधित उत्पादनांच्या गुणवत्तेसाठी राष्ट्रीय कृषी संहिता तयार करण्याची जबाबदारी टाकण्यात आली आहे. त्याचा मोठा फायदा होईल.
परदेशात मागणी वाढेल