ब्रेकिंग : रावेरचा सस्पेन्स संपणार : आज पाच वाजेनंतर राष्ट्रवादीच्या उमेदवाराच्या नावाची घोषणा : उद्योजक श्रीराम पाटील यांच्या नावावर होणार शिक्कामोर्तब

पक्षाच्या कोअर कमिटीच्या बैठकीत निर्णयाची शक्यता

ब्रेकिंग : रावेरचा सस्पेन्स संपणार : आज पाच वाजेनंतर राष्ट्रवादीच्या उमेदवाराच्या नावाची घोषणा : उद्योजक श्रीराम पाटील यांच्या नावावर होणार शिक्कामोर्तब

कृषीसेवक न्यूज नेटवर्क 

रावेर लोकसभा मतदार संघातून भाजपने विद्यमान खासदार रक्षा खडसे यांना उमेदवारी देत आघाडी घेतली आहे. मात्र महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडे हि जागा आल्याने या जागेवर तुल्यबळ लढत देणाऱ्या उमेदवारांची पक्षातर्फे चाचपणी करण्यात येत होती. येथील उद्योजक श्रीराम पाटील यांना या पक्षातर्फे उमेदवारी दिली जाणार असल्याचे जवळपास निश्चित झाले असून पाटील यांच्या नावाची घोषणा आज दि ३ रोजी सायंकाळी पाच वाजता होण्याची शक्यता विश्वसनीय सूत्रांनी वर्तवली आहे. आज दुपारी पक्षाच्या कोअर कमिटीच्या सुरु असलेल्या बैठकीत उद्योजक श्रीराम पाटील यांच्या नावावर एकमत होणार असून त्यानंतर त्यांच्या नावाची उमेदवार म्हणून अधिकृत घोषणा प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील करणार आहेत. त्यामुळे रावेरच्या जागेबाबतचा सस्पेन्स आज संपणार आहे. 

राज्यातील रावेर मतदार संघाकडे सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांचे लक्ष लागले आहे. भाजपने विद्यमान खासदार रक्षा खडसे यांना तिसऱ्यांदा उमेदवारी देत आघाडी घेतली आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटातून अनेक इच्छुकांची नावे  कालांतराने मागे पडत गेली. एड रवींद्र पाटील व उद्योजक श्रीराम पाटील यांच्यापैकी एकाला संधी मिळणार असल्याचे दिसत होते. मात्र एड रवींद्र पाटील यांच्यापेक्षा तुल्यबळ उमेदवार म्हणून उद्योजक पाटील यांच्या नावावर आज दुपारी सुरु असलेल्या पक्षाच्या बैठकीत एकमत होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. 

उमेदवार म्हणून पाटील यांना मिळणार संधी 

रावेर लोकसभा मतदार संघातून भाजपच्या उमेदवार व विद्यमान खासदार रक्षा खडसे यांना तुल्यबळ लढत देण्यासाठी शरद पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांनी श्रीराम पाटील यांच्या नावावर सहमती दर्शवली आहे. त्यामुळे श्री पाटील यांचे नाव उमेदवार म्हणून आज संध्याकाळी पाच वाजेनंतर प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे जाहीर करण्याची अधिक शक्यता आहे.