क्राईम : हद्दपार आरोपीकडून गावठी पिस्तूलसह दोन काडतूस जप्त

रावेर पोलिसांची गणेशोत्सवापूर्वी कारवाई

क्राईम : हद्दपार आरोपीकडून गावठी पिस्तूलसह दोन काडतूस जप्त

कृषीसेवक न्यूज नेटवर्क / रावेर 

येथील दोन वर्षासाठी हद्दपार करण्यात आलेल्या आरोपीकडून रावेरात गावठी बनावटीचे पिस्तूल पोलिसांनी जप्त केले आहे. आरोपी आकाश लक्ष्मण रील रा  रामदेवबाबा नगर रावेर याला पोलिसांनी अटक केली असून त्याच्याकडून गावठी बनावटीचे पिस्तूल व दोन जिवंत काडतूस जप्त करण्यात आले आहे. 

आरोपी आकाश रील याला २३ मार्च २०२३ रोजी फैजपूर येथील उप विभागीय दंडाधिकाऱ्यांच्या हद्दपार प्रस्तावानुसार दोन वर्षासाठी जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आलेले आहे. मात्र सदर आरोपी रावेर शहरात असल्याची व त्याच्याकडे गावठी बनावटीचे पिस्तूल असल्याची गुप्त माहिती पोलीस निरीक्षक कैलास नागरे यांना मिळाली. त्यानुसार एक पथक पाठवून खात्री केली असता रामदेव बाबा नगरात आकाश रील उभा असलेला दिसून आला. पोलिसांनी त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे १५ हजार रुपये किंमतीचा गावठी बनावटीचा देशी कट्टा(पिस्तूल) व ५०० रुपये किमतीचे दोन जिवंत काडतूस आढळून आले. आकाश रील याला पोलिसांनी अटक केली असून त्याच्याविरुद्ध विना परवाना शस्त्र बाळगल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

या पथकाने केली कारवाई 

पोलीस निरीक्षक कैलास नागरे यांच्या मार्गदशनाखाली उप निरीक्षक सचिन नवले, पोलीस कर्मचारी ईश्वर चव्हाण, सुरेश मेढे, सचिन घुगे, अमोल जाधव, सुकेश तडवी, प्रमोद पाटील, विशाल पाटील, समाधान ठाकूर, तथागत सपकाळे, सुनिल मोरे यांच्या पथकाने हि कारवाई केली आहे.