बातम्यांसाठी नवी नियमावली : तोतया पत्रकारांना आळा घालण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना देणार निवेदन : रावेर शहरातील पत्रकारांच्या बैठकीत निर्णय
नव्या नियमावलीला सर्वांचा दुजोरा

रावेर(प्रतिनिधी):
रावेर शहरातील पत्रकार बांधवांची एक महत्त्वपूर्ण बैठक नुकतीच पार पडली. पत्रकारितेतील विविध अडचणी, अनधिकृत व्यक्तींचा हस्तक्षेप आणि बातमी लेखनातील पारदर्शकतेसंदर्भात चर्चा करत सर्वानुमते नव्या नियमावलीची घोषणा करण्यात आली. या ऐतिहासिक निर्णयाला सर्व उपस्थित पत्रकारांनी एकमुखी पाठिंबा दिला.
या बैठकीदरम्यान अनेक मुद्यांवर मंथन करण्यात आले. पत्रकारांना वारंवार भेडसावणाऱ्या अडचणी उदा. बातमीत नाव न आल्याने काही व्यक्तींचा रोष, तसेच तोतया पत्रकारांची वाढती संख्याबाबत चिंता व्यक्त करण्यात आली. या पार्श्वभूमीवर काही ठोस निर्णय घेणे अत्यावश्यक असल्याची भावना व्यक्त झाली आणि त्यावर सर्वसहमतीने नियमावली ठरवण्यात आली.
*बातम्यांबाबत ठरलेली महत्त्वाची नियमावली:*
*तोतया पत्रकारांवर कारवाई*
पत्रकारितेच्या नावाखाली अनेक तोतया पत्रकार असणाऱ्या व्यक्तींवर आळा घालण्यासाठी व त्यांच्यावर कारवाईसाठी जिल्हाधिकारी व पोलिस अधीक्षक यांना निवेदन देण्यात येणार आहे.
*जाहिरात घेऊन बातम्या मागणाऱ्यांवर बंदी– विविध कार्यक्रमासाठी जाहिराती जमा करून या कार्यक्रमाची नंतर बातमी छापण्याची अपेक्षा करणाऱ्या व्यक्ती वा संस्थांचे वृत्त प्रसिद्ध न करण्याचा निर्णयघेण्यात आला.
जाहिरात न देणाऱ्यांची बातमीही बंद – वर्षभर विविध कार्यक्रमांच्या बातम्या अनेक संस्था प्रसिद्ध करून घेतात. मात्र जाहिरात देत नाहीत अशा संस्थांची बातमी प्रसिद्ध न करण्याचे धोरण स्वीकारण्यात आले.
या निर्णयामुळे पत्रकारितेत शिस्त येईल, पारदर्शकता टिकेल आणि पत्रकार बांधवांना संरक्षण मिळेल, असा विश्वास सर्वांनी व्यक्त केला.
*बैठकीस उपस्थित पत्रकार:*
या बैठकीस पत्रकार दिपक नगरे, देवलाल पाटील, दिलीप वैद्य , कृष्णा पाटील, चंद्रकांत विचवे, शकील शेख, सुनिल चौधरी, शालिक महाजन, समशेर खान, राजेंद्र अटकाळे, वासु नरवाडे, जयंत भागवत आदी पत्रकार उपस्थित होते. काही पत्रकार प्रत्यक्ष उपस्थित राहू शकले नाहीत, मात्र त्यांनी दूरध्वनीवरून निर्णयांना पाठिंबा दर्शविला. ही बैठक रावेरच्या पत्रकार क्षेत्रात एक नवा टप्पा ठरेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. पत्रकारांच्या एकजुटीमुळे नव्या नियमावलीची अंमलबजावणी प्रभावीपणे होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.