रावेर निवडणूक : प्रभागाच्या सर्वांगीण विकासाची भाजपचे उमेदवार सोपान पाटील यांची हमी
ठिकठिकाणी औक्षण, जेष्ठांचे आशीर्वाद
प्रतिनिधी/रावेर
वातावरणात गारठा वाढत असतानाच नगरपालिका निवडणुकीने वातावरण गरम झाले आहे. रावेर नगरपालिका निवडणुकीला अवघे पाच दिवस शिल्लक राहिले असून प्रचाराच्या रणधुमाळीने वेग घेतला आहे. प्रभाग क्र.११(ब) मधून भाजपचे अधिकृत उमेदवार सोपान साहेबराव पाटील यांनी प्रचारात आघाडी घेतली आहे. दररोज नियोजनबद्ध प्रचार फेरीमुळे त्यांनी थेट मतदारांशी संपर्क केला आहे. भाजपच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार संगीता महाजन व याच प्रभागातील भाजपच्या महिला उमेदवार सीमा जमादार यांच्यासह एकत्रितपणे केलेल्या प्रचारामुळे या तिन्ही जागांवर विजय निश्चित समजला जात आहे. प्रचार करतांना अनेक ठिकाणी महिलांकडून त्यांचे औक्षण केले जात आहे तर जेष्ठांचे त्यांना आशीर्वाद मिळत आहेत. पक्षाच्या जेष्ठ पदाधिकार्यांच्या मार्गदर्शनात प्रचाराचे योग्य नियोजन करण्यात आल्याने थेट मतदारांपर्यंत पोहचले आहेत.
या प्रभागाला पक्षाच्या माध्यमातून प्राथमिक सुविधा पुरविण्यासह प्रभागाला आदर्श बनविण्याचा त्यांचा संकल्प आहे. दररोज शुद्ध व पुरेसा पाणीपुरवठा, अंतर्गत रस्ते, स्ट्रीटलाईट, सांडपाण्याचा प्रश्न, गटारी, कचऱ्याचे व्यवस्थापन या समस्या सोडवून प्रभागाच्या सर्वांगीण विकासाची हमी प्रभाग ११(ब) मधील भाजपचे उमेदवार सोपान साहेबराव पाटील यांनी दिली आहे. मतदारांचा त्यांना उत्स्फुर्तपणे पाठींबा मिळत असून मतदार भाजपला सेवेची संधी नक्की देतील असा विश्वास श्री पाटील यांनी व्यक्त केला आहे. हा भाग पूर्वी पालिका हद्दीच्या बाहेर असल्याने वर्षानुवर्षापासून या भागातील मतदार विकासापासून वंचित आहेत. विकासाचा हा अनुशेष भविष्यात पक्षाच्या माध्यमातून भरून काढू असे आश्वासन त्यांनी प्रचारात मतदारांना दिले आहे.

krushisewak 
