BREKING : रावेर बाजार समिती सभापती उपसभापती पदासाठी 6 ऑक्टोबरला निवड : प्रल्हाद पाटील यांना मिळणार सभापतीपदाची संधी
उपसभापतीच्या नावावर चार तारखेला होणार शिक्कामोर्तब
प्रतिनिधी / रावेर
येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती व उपसभापती पदासाठी 6 ऑक्टोबरला निवड होत आहे. 23 सप्टेंबरला सभापती सचिन पाटील व उप सभापती योगेश पाटील यांच्याविरुद्ध संचालकांनी दाखल केलेला अविश्वास प्रस्ताव मंजूर झाला होता. त्यामुळे रिक्त झालेल्या या दोन्ही पदांसाठी सहकार विभागाने निवडणूक जाहीर केली आहे. अविश्वास प्रस्ताव दाखल करण्याचे नेतृत्व संचालक प्रल्हाद पाटील यांनी केल्याने सभापती पदासाठी त्यांचेच नाव निश्चित असल्याची विश्वासनीय सूत्रांकडून माहिती मिळाली आहे.
ठरल्याप्रमाणे सभापती सचिन पाटील व उपसभापती योगेश पाटील यांनी पदाचे राजीनामे न दिल्याने संचालकांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली होती. तसेच बाजार समितीच्या कामकाजात बाहेरील व्यक्तीचा हस्तक्षेप वाढल्याचा आरोप करीत 12 संचालकांनी सचिन पाटील व योगेश पाटील यांच्याविरुद्ध अविश्वास प्रस्ताव दाखल केला होता. 23 सप्टेंबरला 14 विरुद्ध 0 असा अविश्वास ठराव मंजूर झाला होता.
दरम्यान अविश्वास ठराव मंजूर झाल्याने सचिन पाटील व योगेश पाटील यांना पदावरून पाय उतार व्हावे लागले आहे. दरम्यान, रिक्त झालेल्या या दोन्ही पदाच्या निवडीसाठी 6 ऑक्टोबरला सहाय्यक निबंधक धर्मराज पाटील यांच्या अध्यक्षतेखाली विशेष सभा बोलविण्यात आली आहे. अविश्वास प्रस्ताव दाखल करण्याचे नेतृत्व करणारे संचालक प्रल्हाद पाटील यांचे नाव सभापती पदासाठी निश्चित झालेले असल्याचे सूत्राकडून समजले.
चार तारखेला उप सभापतीच्या नावावर होणार शिक्कामोर्तब
बाजार समितीच्या उप सभापती पदासाठी अद्याप कोणाचेही नाव निश्चित नसल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. मात्र अविश्वास दाखल करणाऱ्या 14 संचालकांची 4 ऑक्टोबरला बैठक होण्याची अधिक शक्यता असून या बैठकीत उप सभापती पदासाठी नाव निश्चित होणार आहे. तसेच उर्वरित कालावधीसाठी उप सभापती पदाची संधी देण्यात येणाऱ्या संचालकांची नावे निश्चित करण्यात येण्याची अधिक शक्यता आहे.

krushisewak 
