रावेर निवडणूक : प्रभाग १२(अ) मधील अपक्ष उमेदवार प्रमिला पाटील यांनी उभे केले कडवे आव्हान

प्रभागाला आदर्श बनविण्याचा संकल्प

रावेर निवडणूक : प्रभाग १२(अ) मधील अपक्ष उमेदवार प्रमिला पाटील यांनी उभे केले कडवे आव्हान

प्रतिनिधी/रावेर

रावेर नगरपालिका निवडणुकीला अवघे पाच दिवस शिल्लक राहिले असून प्रचाराच्या रणधुमाळीने राजकीय वातावरण गरम झाले आहे. प्रभाग क्र. १२ (अ) मधून निवडणुकीत उभ्या असलेल्या अपक्ष उमेदवार प्रमिला चुडामण पाटील यांनी प्रचारात आघाडी घेतली आहे. या प्रभागात प्राथमिक सुविधा पुरविण्यासह प्रभागाला आदर्श बनविण्याचा त्यांचा संकल्प आहे. मतदारांचा त्यांना उत्स्फुर्तपणे पाठींबा मिळत असून मतदार सेवेची संधी नक्की देतील असा विश्वास अपक्ष उमेदवार प्रमिला चुडामण पाटील यांनी व्यक्त केला आहे.

प्रभाग क्र. १२ (अ) मधून प्रमिला चुडामण पाटील(अपक्ष) उमेदवार म्हणून निवडणुकीत उतरल्या आहेत. माजी नगराध्यक्ष रिया शितल पाटील या भाजपकडूनतर तर रेखा रमेश महाजन या शिवसेना (उबाठा) या पक्षाच्या अधिकृत उमेदवार आहेत. अपक्ष उमेदवार प्रमिला पाटील यांच्या उमेदवारीमुळे प्रतिस्पर्धी उमेदवारांसमोर कडवे आव्हान उभे केले आहे. सौ. पाटील यांच्या घराण्याला समाजसेवेचा वारसा असून त्यांचा व कुटुंबियांचा मोठा जनसंपर्क आहे. प्रभागाच्या सर्वांगीण विकासाचा आपला ध्यास आहे. प्रभागातील प्रश्नांची जाण असल्याने भविष्यात ते सोडविण्याला प्राधान्य दिले जाईल. तसेच प्रभागाचा सर्वांगीण विकास करून प्रभागाला आदर्श बनविण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला. प्रचार फेरी दरम्यान मतदारांचा मोठा पाठींबा मिळत असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.