सुनील कोंडे यांचा राष्ट्रवादी पक्षाचा (शरद पवार गट) राजीनामा : कोंडे काँग्रेसच्या वाटेवर
रावेर तालुक्यात राष्ट्रवादीला पुन्हा खिंडार
प्रतिनिधी/ रावेर
राष्ट्रवादी काँग्रेसचे( शरद पवार गट)जिल्हा सरचिटणीस सुनील भागवत कोंडे रा निंभोरा ता रावेर यांनी जिल्हा सरचिटणीस पदाचा व सदस्य पदाचा राजीनामा आज जिल्हाध्यक्षाकडे दिला आहे.
गेल्या 9 वर्षापासून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा मी निष्ठावंत सहकारी असून याकाळात पक्षाचे विचार समाजापर्यंत पोहचविण्याचे काम प्रामाणिकपणे केले आहे तसेच ओबीसी सेल रावेर तालुकाध्यक्ष या पदावर राहून वेगवेगळ्या आंदोलनात सक्रिय किंवा पक्षाने केलेल्या आंदोलनात व सभेस प्रत्येक वेळी हजर राहून उपस्थिती दिली. मात्र यापुढे पक्षासाठी उपस्थित राहणार येत नसल्याने सरचिटणीस व सदस्य पदाचा राजीनामा देत आहे. असे त्यांनी जिल्हाध्यक्षाना पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे.दरम्यान, राष्ट्रवादीचा राजीनामा दिल्यानंतर पुढील वाटचाल त्यांची काँग्रेस पक्षात होण्याची शक्यता आहे. ते काँग्रेसच्या वाटेवर असल्याचे समजते.

krushisewak 
