राष्ट्रवादीच्या रावेर तालुकाध्यक्षपदी गणेश महाजन

पक्षाने दाखवलेला विश्वास सार्थ ठरवू : महाजन

राष्ट्रवादीच्या रावेर तालुकाध्यक्षपदी गणेश महाजन

रावेर / प्रतिनिधी 

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या (अजित पवार गट )रावेर तालुकाध्यक्ष पदी कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक व आटवाडा येथील माजी सरपंच गणेश महाजन यांची नियुक्ती करण्यात अली आहे. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांच्या आदेशावरून जिल्हाध्यक्ष उमेश नेमाडे यांनी यांनी हि नियुक्ती केली आहे. रावेर तालुक्यात पक्ष बळकटीकरण व संघटनात्मक बांधणीसाठी हि निवड करण्यात आली आहे. तसेच पक्षाची ध्येय धोरणे सर्व सामान्य नागरिकांपर्यंत पोहचवून त्यांच्या विकासासाठी नवनिर्वाचित तालुकाध्यक्ष श्री महाजन प्रयत्नशील राहणार आहेत.यावेळी प्रदेश सरचिटणीस रवींद्र पाटील, युवक जिल्हाध्यक्ष अरविंद चितोडीया, सामाजिक न्याय जिल्हाध्यक्ष रवींद्र सपकाळ, भुसावळ शहर अध्यक्ष संतोष चौधरी, जळगाव जिल्हा नियोजन समिती सदस्य राजेश वानखेडे, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य रमेश पाटील, रावेर कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती सचिन पाटील, बाजार समिती संचालक जयेश कुयटे उपस्थित होते.   

"पक्षाच्या माध्यमातून सर्वसामान्यांचे, शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी आगामी काळात प्रयत्न राहतील. पक्षाने माझ्यावर दाखविलेला विश्वासाला तडा जाऊ देणार नाही." 

-----गणेश महाजन, तालुकाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, रावेर