रावेर निवडणूक : प्रभागाचा सर्वांगीण विकास हाच एकमेव अजेंडा : अपक्ष उमेदवार प्रमिला पाटील यांचे आश्वासन
प्रभाग क्र १२ मधील लढतीकडे मतदारांचे लक्ष
प्रतिनिधी/रावेर
रावेर नगरपालिका निवडणुक अंतिम टप्प्यात आली असून प्रचार शिगेला पोहचला आहे. प्रचाराच्या रणधुमाळीने राजकीय वातावरण तापले आहे. प्रभागाचा सर्वांगीण विकास हाच एकमेव आपला अजेंडा असल्याचे प्रभाग क्र.१२(अ) मधून निवडणुकीत उभ्या असलेल्या अपक्ष उमेदवार प्रमिला चुडामण पाटील यांनी मतदारांना भेटी दरम्यान आश्वासन दिले आहे. प्रतिस्पर्धी उमेदवारांच्या तुलनेत त्यांनी प्रचारात आघाडी घेतली आहे.
नागरिकांची सेवा अधिक चांगल्या पद्धतीने करता यावी, वर्षानुवर्षांपासून असलेले प्रभागातील प्रश्न सुटावेत यासाठी सौ. प्रमिला पाटील या प्रभागातून नगरपालिका निवडणुकीत उतरल्या आहेत. या भागातील मतदारांशी असलेला दीर्घकालीन संपर्क, सामाजिक कार्यात कुटुंबियांचा सतत असलेला सहभाग, नागरिकांचे प्रश्न, समस्या सोडविण्यासाठी असलेली कणखर भूमिका यामुळे मतदारांचा आपल्यावर विश्वास आहे. शुद्ध व पुरेसा पाणीपुरवठा, अंतर्गत रस्ते, स्ट्रीट लाईटची सुविधा, ओपन स्पेस जागांचा विकास, घरातून निघणाऱ्या कचऱ्याचे नियमित व्यवस्थापन, प्रभागाची नियमित स्वच्छता, भूमिगत गटारींचा प्रश्न सोडविण्याला प्राधान्य देण्यात येणार असल्याची माहिती अपक्ष उमेदवार प्रमिला पाटील यांनी दिली. मतदारांच्या भेटीगाठी घेवून त्यांच्याशी प्रभागाच्या विकासाबाबत चर्चा करण्यात येत आहेत. व प्राथमिक सुविधा पुरविण्यासह प्रभागाला आदर्श बनविण्याचा त्यांचा संकल्प आहे. मतदारांचा त्यांना उत्स्फुर्तपणे पाठींबा मिळत असून मतदार सेवेची संधी नक्कीदेतील असा विश्वास अपक्ष उमेदवार प्रमिला चुडामण पाटील यांनी व्यक्त केला आहे. प्रभागाच्या सर्वांगीण विकासाचा आपला ध्यास आहे. प्रभागातील प्रश्नांची जाण असल्याने भविष्यात ते सोडविण्याला प्राधान्य दिले जाईल. तसेच प्रभागाचा सर्वांगीण विकास करून प्रभागाला आदर्श बनविण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला. प्रचार फेरी दरम्यान मतदारांचा मोठा पाठींबा मिळत असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

krushisewak 
