आमदार अमोल जावळे भाजपच्या उमेदवारासाठी मैदानात : प्रभाग ११ मधील मतदारांच्या घेतल्या भेटीगाठी
प्रभागाच्या विकासासाठी निधी देण्याचे आश्वासन
प्रतिनिधी/रावेर
निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्याकडे वाटचाल करीत असताना आमदार अमोल जावळे भाजपच्या उमेदवारांसाठी थेट मैदानात उतरले आहेत. प्रभाग क्रमाक ११ मधील भाजपचे उमेदवार सोपान साहेबराव पाटील व सीमा आरिफ जमादार यांच्यासाठी या प्रभागातील मतदारांच्या घरी जाऊन भेटी घेतल्या. येणाऱ्या काळात या प्रभागात प्राथमिक सुविधा पुरविण्याला प्राधान्य देणार असून प्रभागाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी आवशक तो निधी दिला जाईल असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले आहे.
प्रभाग क्रमाक ११ मधून भाजपतर्फे सोपान साहेबराव पाटील व सीमा आरिफ तडवी हे उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. या दोन्ही उमेदवारांना मतदारांचा उत्स्फुर्तपणे पाठींबा मिळत असून त्यांनी प्रभागाच्या विकासासाठी आपण कटीबद्ध असल्याचे आश्वासन दिले आहे. या भागातील असलेले प्रश्न समस्या या दोन्ही उमेदवारांनी समजून घेतले असून भविष्यात शुद्ध व पुरेसा पाणी पुरवठा, भूमिगत गटारींचा प्रश्न, अंतगर्त रस्त्यांची दुरुस्ती, कचऱ्याचे नियमितपणे व्यवस्थापन, स्ट्रीटलाईटची सुविधा यासह अन्य समस्या सोडविण्यावर भर दिला जाणार आहे.
दरम्यान, आमदार अमोल जावळे यांनी या प्रभागातील मतदारांच्या उमेदवार सोपान साहेबराव पाटील व सीमा आरिफ जमादार यांच्यासोबत भेटी घेतल्या. यावेळी मतदारांनी भाजपच्या उमेदवाराला मतदान करून विजयी करण्याचे आश्वासन आमदार अमोल जावळे यांना दिले आहे. या भागातील रस्त्यांचा व स्ट्रीट लाईट चा प्रश्न प्राधान्याने येत्या सहा महिन्यात सोडविण्याचे आश्वासन आमदार श्री जावळे यांनी मतदारांशी चर्चा करतांना दिले आहे. मतदारांचा कौल भाजपच्या या उमेदवारांना मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही.

krushisewak 
