आमदार अमोल जावळे यांनी दिलेला शब्द पाळला : अखेर रस्त्याचा प्रश्न सुटला : मंत्री गिरीश महाजन यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून रावेर- पुनखेडा-पातोंडी रस्त्याच्या डांबरीकरणाचे भूमिपूजन

रस्त्याच्या दुरुस्तीसाठी पाच कोटी मंजूर

रावेर /प्रतिनिधी 

रावेर-पुनखेडा-पातोंडी या रस्त्याची अतिशय दुर्दशा झाली होती.वारंवार दुरुस्तीची मागणी करूनही याकडे लक्ष दिले जात नव्हते. आमदार अमोल जावळे यांनी मतदारांना विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी रस्त्याचा प्रश्न सोडविण्याचा शब्द दिला होता. त्यांनी त्यांचे नेते व मार्गदर्शक मंत्री गिरीश महाजन यांच्या वाढदिवसाचे निमित्त साधत या रस्त्याच्या डांबरीकरणाच्या कामाचे भूमिपूजन केले. आज महंत राजगिरी महाराज यांच्या हस्ते व भाजपचे विविध पदाधिकारी, ग्रामस्थ आणि नागरिकांच्या उपस्थितीत भूमिपूजन कार्यक्रम करण्यात आला.

सुमारे पाच कोटी रुपयांच्या निधीतून हा रस्ता तयार केला जाणार असून, आमदार अमोल जावळे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे या रस्त्याच्या दुरुस्तीचा प्रस्ताव मंजूर झाला. गेल्या काही वर्षांपासून या रस्त्याची अवस्था अत्यंत खराब झाली होती. त्यामुळे वाहनधारक व प्रवाशांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत होते. या रस्त्याच्या डांबरीकरणामुळे रावेर ते पातोंडी या भागांचा संपर्क अधिक चांगल्या प्रकारे प्रस्थापित होणार असून, मुक्ताईनगर-रावेर दरम्यानचा प्रवास अधिक सुरक्षित, जलद आणि सुखकर होईल.

शब्द पाळणारा लोकप्रतिनिधी 

पुनखेडा व पातोंडी येथील नागरीक रस्त्याच्या दुरावस्थेमुळे वैतागले होते. विधानसभेचे उमेदवार अमोल जावळे या गावात प्रचारासाठी आले असता त्यांना मतदारांनी रस्त्याची समस्या सांगितली होती. त्यावेळी श्री जावळे यांनी आपण विजयी झाल्यावर या रस्त्याच्या दुरुस्तीला प्राधान्य देऊ असा शब्द दिला होता. आज या रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन करीत आमदार जावळे यांनी दिलेला शब्द पाळला आहे. आजपासून प्रत्यक्ष कामास सुरुवात झाल्याने ग्रामस्थांमध्ये समाधान व्यक्त होत आहे. अनेक वर्षांची मागणी पूर्ण होत असल्याने नागरिकांनी आमदार अमोल जावळे यांचे आभार मानले व शब्द पाळणारा लोकप्रतिनिधी असल्याच्या भावना व्यक्त केल्या. यावेळी भाजप प्रदेश सदस्य सुरेश धनके, जिल्हा उपाध्यक्ष पद्माकर महाजन, प्रल्हाद पाटील, माऊली फाउंडेशन अध्यक्ष डॉ. संदीप पाटील, प स माजी सदस्य पि.के.महाजन, भाजप तालुकाध्यक्ष रवींद्र पाटील, एड सूर्यकांत देशमुख, दुर्गेश पाटील, पुनखेडा सरपंच सौ. कीर्ती पाटील, पातोंडी सरपंच सौ. नम्रता कोळी, राजन लासूरकर , बाळा आमोदकर, रमेश सावळे, लक्ष्मण सावळे, राजेंद्र पाचपोहे, डिगंबर बोरसे, आशा सपकाळे, गणेश बोरसे, मोहन बोरसे यांची उपस्थिती होती.