BREAKING : पित्याच्या खूनप्रकरणी पुत्रास जन्मठेपेची शिक्षा : रावेर तालुक्यातील घटना

जेवणात उडदाची डाळ केल्यावरून केला होता खून

BREAKING : पित्याच्या खूनप्रकरणी पुत्रास जन्मठेपेची शिक्षा : रावेर तालुक्यातील घटना

प्रतिनिधी/रावेर

जेवणात उडदाची डाळ केली असल्याचा राग येऊन मुलाने जन्मदात्या पित्याच्या डोक्यात खाटीचा माचा मारून खून केल्याची घटना रावेर तालुक्यातील पाल शिवारात घडली होती. आरोपी मुलगा दिनेश उर्फ शिवा अनजा बारेला याला पोलिसांनी अटक करून त्याच्याविरुद्ध चाललेल्या खटल्यात त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

पाल शिवारात अनाजा भारत्या बारेला हा मुलगा आरोपी दिनेश उर्फ शिवा अनजा बारेला (वय-26) याचे सोबत राहत होता. त्याचे वडील अनाजा बारेला यांनी जेवन करुन घे असे दिनेशला सांगितले. तेव्हा त्याने काय भाजी केली असे वडिलांना विचारले. मयत वडीलांनी जेवनात उडदाची दाळ केली असे सांगीतल्याने याचा राग येवुन संतापात खाटीच्या माच्याने मुलगा दिनेशने वडिलांच्या डोक्यावर प्रहार करून खून केला होता. व खून झाल्यावर तेथून निघून गेला होता. ही घटना नोव्हेंबर 2021 मध्ये घडली होती. मयताची मुलगी बनाबाई नरसिंग बारेला हिच्या फिर्यादीवरुन मुलाविरुद्ध खुनाच्या गुन्ह्याची रावेर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली होती. सदर चा गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर गुन्हयाच्या तपास अधिकारी पो.उप. निरीक्षक सचिन नवले, सपोनि. शितलकुमार नाईक यांनी गुन्हयाचा तपास केलेला असुन या गुन्हयात फिर्यादी, पंच, साक्षीदार यांचे जबाब महत्वाचे ठरले आहे. सदर खटल्यात सरकार पक्षातर्फे एकूण 16 साक्षीदार तपासण्यात आले होते व त्यात आरोपीची बहीण, जन्मदाती आई व त्याचा 10 वर्षापासुनचा जवळचा मित्र यांच्या साक्षी महत्वपुर्ण ठरल्या आहेत. सदर गुन्हयात तपासात मदत करणारे भौतीक दुवे यांचा योग्य रितीने वापर करुन आरोपी मुलास जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आलेली. भुसावळ येथील सत्र न्यायालयाचे न्या. एस बी हेडावू यांनी आरोपीस भा.द.वी कलम 302,323 अन्वये जन्मठेपेची शिक्षा सक्त मजुरी व 1000/- रुपये दंड व दंड न भरल्यास एक महीना साधी कैदेची शिक्षा सुनावली आहे.

सदर गुन्हयाच्या तपासात डॉ. महेश्वर रेडडी पोलिस अधिक्षक, अशोक नखाते अप्पर पो. अधिक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली तत्कालीन सहा. पो. अधिक्षक श्रीमती अन्न्पुर्णा सिंग, पोलिस निरीक्षक डॉ. विशाल जयस्वाल, सपोनि. शितलकुमार नाइक .पो.उप. निरीक्षक सचिन नवले, पो.हे.कॉ/ राजेंद्र राठोड, पो.कॉ/ ईश्वर चव्हाण, पो.ना. कल्पेश आमोदकर, पो.कॉ/ नरेंद्र बाविस्कर, पोकाँ ईस्माईल तडवी, पो.कॉ/ मुकेश मेढे पैरवी अधिकारी कांतीलाल कोळी यांचा महत्वाचा सहभाग होता. सदर गुन्हयात सरकार पक्षातर्फ सहा. सरकारी अभियोक्ता मोहन देशपांडे यांनी प्रभावी युक्तीवाद केला होता.