कृषिमित्र हरिभाऊ जावळे यांच्या जयंतीदिनी फैजपूरला केळी परिसंवाद
जिल्हाधिकारी करणार परिसंवादाचे उदघाटन
प्रतिनिधी/फैजपूर
कृषिमित्र माजी खासदार स्व हरिभाऊ जावळे यांच्या जयंतीनिमित्ताने मंगळवार दि ३ रोजी शेतकरी बांधवांसाठी फैजपूर येथे केळी परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे. फैजपूर येथील यावल रोडवरील सुमंगल लॉन येथे सकाळी ८ वाजता या परिसंवादाला सुरुवात होईल. परिसंवादाचे उदघाटन जिल्हाधिकारी आयुष प्रसाद करतील. तर जैन इरिगेशनचे उपाध्यक्ष तथा जेष्ठ केळी तज्ज्ञ के बी पाटील हे केळीचे अन्नद्रव्य आणि करपा, पिटींग व सीएमव्ही रोगाचे व्यवस्थापन या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत. तर प्रसिद्ध केळी निर्यातदार किरण ढोके हे केळी उत्पादक ते केळी निर्यातदार यशस्वी प्रवास कथन करतील. युवा केळी निर्यातदार बलरामसिंग सोळंके हे केळी निर्यातीसाठी नोंदणी प्रमाणपत्र, आयात निर्यात प्रक्रिया, बँक हमी आणि जागतिक व्यापार यावर शेतकऱ्यांना मार्गदशन करणार आहेत. या परिसंवादाचा केळी उत्पादक शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे.