आमदार शिरीष चौधरींच्या हस्ते सुकी धरणावर जलपूजन

आजार बाजूला सारत लोकहिताच्या कामांना दिले प्राधान्य

आमदार शिरीष चौधरींच्या हस्ते सुकी धरणावर जलपूजन

कृषीसेवक न्यूज नेटवर्क / रावेर

रावेर तालुक्याला समृद्धी प्राप्त झाली आहे ती खऱ्या अर्थाने सुकी नदीवरील गारबर्डी येथील धरणामुळे. माजी विधानसभाध्यक्ष व तत्कालीन मंत्री स्व लोकसेवक मधुकरराव चौधरी यांच्या दूरदृष्टीतून या धरणाची निर्मिती करण्यात आली आहे. सध्या हे धरण पूर्ण क्षमतेने भरले असून नदीतून पाण्याचा प्रवाह वाहत आहे. स्व चौधरी यांचे सुपुत्र आमदार शिरीष चौधरी हे त्यांचा समाजसेवेचा वारसा जोपासत आहेत. धरणातील पाण्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आजारपण बाजूला सारत शुक्रवारी (दि १४ ) आमदार चौधरी यांनी सपत्नीक धरणस्थळावर जाऊन जलपूजन केले.

स्व मधुकरराव चौधरी यांनी त्यांच्या लोक प्रतिनिधित्वाच्या काळात तालुक्यात ठिकठिकाणी धरण बांधून शेतीसाठी पाणी उप्लब्ध करून दिले आहे. तालुक्यात मोठ्या प्रमाणावर होणारी केळीची लागवड, व त्यामुळे शेतीत आलेली समृद्धता यामागे स्व. चौधरी यांचे मोठे योगदान आहे. शेतकरी आर्थिकदृष्ट्या सक्षम झाला पाहिजे यासाठी शेती सिंचनाखाली आणण्याला मधुकरराव चौधरी यांनी प्राधान्य दिले व धरणाची निर्मिती केली. सध्या त्यांचे सुपुत्र व रावेर विधानसभा मतदार संघाचे विद्यमान आमदार शिरीष चौधरी त्यांचा समाजसेवेचा वसा व वारसा जोपासत आहेत. 

जनतेच्या कामांना प्राधान्य 

आमदार चौधरी यांच्यावर काही दिवसापूर्वी एक मोठी शस्त्रक्रिया झाली. गुरुवारी ते खिरोदा येथे दाखल झाले . सध्या त्यांना विश्रांतीची गरज असतांना त्यांनी पुन्हा नव्या दमाने लोकहिताच्या कामांना सुरुवात केली आहे. सुकी धरण पूर्ण क्षमतेने भरल्यावर जलाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी गेल्या वर्षीपासून आमदार चौधरी धरणस्थळी जाऊन जलपूजन  करतात. यावर्षी धरण भरले असून सांडव्यावरून ४० सेंटीमीटर पाण्याचा प्रवाह नदी पात्रात सोडला जात आहे. शुक्रवारी आमदार शिरीष चौधरी यांनी सपत्नीक जलपूजन केले. या कार्यक्रमाचे आयोजन काँग्रेसचे युवक प्रदेश उपाध्यक्ष धनंजय चौधरी यांनी केले होते.  यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य प्रभाकर सोनवणे, सुरेखा नरेन्द्र पाटील, रावेरचे माजी नगराध्यक्ष दारा मोहंमद, हरीश गणवाणी, सुनील कोंडे, प्रल्हाद बोन्डे, बाजार समिती सभापती सचिन पाटील, उप सभापती योगेश पाटील, संचालक गणेश महाजन, जयेश कुयटे, यावलचे समीर मोमीम, मनोहर सोनवणे, अनिल जंजाळे, कदिर खान, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष डॉ राजेंद्र पाटील, तुकाराम बोरोले, केतन किरंगे, वाय एस महाजन, विवरे खुर्दचे संदीप पाटील, माजी सरपंच किशोर चौधरी, व्ही आर पाटील, आर एल चौधरी, अजित पाटील यांच्यासह नागरिक उपस्थित होते.