कृषिसेवक न्युज नेटवर्क /रावेर
तालुक्यातील धुरखेडा येथे गेल्या चार पाच दिवसांपासून बिबट्याने हैदोस घातला असून त्याच्या हल्ल्यात तीन शेळ्या ठार झाल्या आहेत. दरम्यान कामासाठी शेतात जाणाऱ्या मजुरांना बिबट्याचे दर्शन झाल्याने मजूर वर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
धुरखेडा येथील दोन जणांच्या तीन बकऱ्या (शेळ्या) बिबट्याने हल्ला करून फस्त केल्याची घटना घडली आहे. याला वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी दुजोरा दिला असून घटनास्थळी त्यांनी भेट देवून पाहणी केली आहे. दरम्यान पिंप्रीनांदू व धुरखेडा येथील काही मजुरांना संध्याकाळी या गावाच्या शेती शिवारात बिबट्याचे दर्शन झाल्याने मजूर वर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.