BANANA EXPORTS : केळी निर्यातीत जळगावच्या तुलनेत सोलापूर जिल्हा पुढे : लागवडीखालील क्षेत्रातही सोलापूरमध्ये मोठी वाढ : केंद्र सरकारच्या कृषी निर्यात क्षेत्रात सोलापूर जिल्ह्याच्या समावेशासाठी लोकप्रतिनिधींचा प्रयत्न
शेतकऱ्यांनी निर्यातक्षम उत्पादनावर भर द्यावा : जेष्ठ केळी तज्ञ डॉ के बी पाटील यांचे आवाहन
कृष्णा पाटील / रावेर
केळी उत्पादनात एकेकाळी मक्तेदारी असलेला जळगाव जिल्हा परदेशात केळी निर्यातीत मात्र सोलापूर जिल्ह्याच्या तुलनेत बराच मागे असल्याचे दिसून आले आहे. केळीची लागवड व उत्पादन इतर जिल्ह्यात व राज्याबाहेरही होत असल्याने एकेकाळी देशात केळी उत्पादनाची मक्तेदारी असलेला जळगाव जिल्हा आता काळाच्या ओघात मागे पडत आहे. मोठ्या प्रमाणावर जळगाव जिल्ह्यात केळीचे उत्पादन असलेल्या या जिल्ह्यातून परदेशात नाममात्रच केळीची निर्यात होत आहे. तर सोलापूर जिल्हा केळी निर्यातीत राज्यात प्रथम क्रमांकावर पोहचला असून लागवडीखालील क्षेत्रातही मोठी वाढ झाली आहे. केंद्र सरकारच्या कृषी निर्यात क्षेत्रात सोलापूर जिल्ह्याचा समावेश व्हावा यासाठी सोलापूरच्या स्थानिक लोक्प्रतीनिधीतर्फे प्रयत्न सुरु आहे. सोलापूरचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांची भेट घेवून यासंदर्भात निवेदन दिले आहे.
महाराष्ट्रातील एकूण केळी निर्यातीपैकी सुमारे ५८ टक्के निर्यात एकट्या सोलापूर जिल्ह्यातून होत आहे. गेल्या वर्षी महाराष्ट्रातून सुमारे ११ लाख २३ हजार ५२४ मेट्रिक टन केळी सोलापूर जिल्ह्यातून निर्यात (एक्स्पोर्ट) झाली होती. एप्रिल २०२३ ते सप्टेंबर २०२४ या कालावधीत राज्यातून सुमारे २५ हजार कंटेनर केळीची निर्यात झाली होती. त्यातील १६ हजार कंटेनर फक्त सोलापूर जिल्ह्यातून निर्यात झाली आहे. सोलापूर जिल्ह्याच्या तुलनेत जळगाव जिल्हा निर्यातीत बराच मागे पडला आहे.
सोलापूरचा कृषी निर्यात क्षेत्रात समावेशासाठी प्रयत्न
सोलापूर जिल्ह्यातून परदेशात दरवर्षी मोठ्या प्रमाणावर केळीची निर्यात होत आहे. तर याच जिल्ह्यातील केळीच्या लागवडीखालील क्षेत्रात दरवर्षी मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. सोलापूर जिल्ह्यातून केळी निर्यातीस चालना देण्यासाठी या जिल्ह्यातील केळी उत्पादक शेतकऱ्यांचे स्थानिक लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून प्रयत्न सुरु आहेत. केंद्र सरकारतर्फे राबवल्या जाणाऱ्या क्षेत्रनिहाय विकास कार्यक्रमांतर्गत सोलापूर जिल्ह्याचा केळी पिकाच्या कृषी निर्यात क्षेत्रात समावेश करण्यासाठी सोलापूरचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी नुकतीच केंद्रीय कृषी मंत्री पियुष गोयल यांची भेट घेव्य्न त्यांना याबाबत निवेदन दिले आहे.
--- डॉ के बी पाटील, जेष्ठ केळी तज्ञ तथा उपाध्यक्ष जैन इरिगेशन जळगाव