निवडणूक : प्रभागाच्या विकासाचा संकल्प : अपक्ष उमेदवार प्रमिला पाटील यांचे वचन

मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

निवडणूक : प्रभागाच्या विकासाचा संकल्प : अपक्ष उमेदवार प्रमिला पाटील यांचे वचन

रावेर/प्रतिनिधी

रावेर नगरपालिकेच्या प्रभाग १२ मध्ये अतिशय अटीतटीची व चुरशीची लढत होत आहे. अपक्ष उमेदवार प्रमिला चुडामन पाटील या कपाट या निशाणीवर प्रतिस्पर्धी मातब्बर उमेदवाराशी लढत देत आहेत. प्रमिला पाटील यांनी मतदारांच्या भेटी घेवून या प्रभागाचा विकास हाच आपला संकल्प असल्याचे वचन दिले आहे. त्यामुळे त्यांना मतदारांचा उत्स्फुर्तपणे पाठींबा मिळत आहे. मतदारांनी दाखवलेल्या विश्वासाच्या बळावर या प्रभागातून त्यांचा विजय निश्चित मानला जात आहे.

 त्या सेवानिवृत्त नायब तहसीलदार बंडू(चुडामण) पाटील यांच्या पत्नी आहेत. सौ प्रमिला चुडामन पाटील या पहिल्यांदाच निवडणूक लढत असल्याने त्यांना नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहेत. भावी काळात आपण या प्रभागात काय काम करणार आहोत याचा अजेंडा प्रमिला पाटील यांनी मतदारांसमोर प्रचारावेळी मांडला. त्यामुळे मतदारांचा विश्वास संपादन करण्यात त्या यशस्वी ठरल्या आहेत.

प्रमिला चुडामन पाटील शहरातील येथील रामबाग मैदानात रहिवासी असलेले सेवानिवृत्त नायब तहसीलदार चुडामण उर्फ बंडू पाटील यांच्या पत्नी आणि उच्चशिक्षित अधिकारी मुलगा सचिन पाटील यांच्या मातोश्री आहेत. मुलगा आणि पती उच्चशिक्षित असल्यामुळे शहराचा खुंटलेला विकास व नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी पाटील परिवाराने सौ. प्रमिला चुडामण पाटील यांना अपक्ष निवडणुकीच्या रिंगणात उतरविलेले  आहेत. नवीन चेहऱ्यांना संधी देण्यासाठी या परिसरात मतदारांचा सौ. प्रमिला पाटील यांना उत्स्फूर्त प्रतिसाद दिसून येत आहेत. त्यांनी सर्व प्रभाग पिंजून काढला त्यात नागरिकांच्या समस्या त्यांनी जाणून घेतल्या. शहरात नव्याने समाविष्ट झालेला मोठा भाग या प्रभागात आहेत. तेथे रस्ते नाही, गटारी नाही, पथदिवे नाहीत, पिण्याच्या पाण्याची गैरसोय, अस्वच्छता कचरा उचलण्यासाठी पालिकेचे दुर्लक्ष अशा समस्या आहेत. या सोयीसुविधा आपण नागरिकांना मिळवून देऊ असा विश्वास देताना मतदारांनी त्यांना निवडून आणण्याची ग्वाही दिल्याचे त्यांच्या प्रचारातून दिसून आले.

या वचनबद्ध विकास योजना अस्तित्वात उतरवणार.

१) स्वच्छ, सुरक्षित आणि स्मार्ट रावेर शहर - स्मार्ट रस्ते, सी.सी.टि.व्ही. कव्हरेज, दिवाबत्ती व्यवस्था, आधुनिक कचरा व्यवस्थापन.

२) २४ तास जलपुरवठा -पाणी टंचाईला कायम पूर्ण विराम, नवीन पाईपलाईन गळती नियंत्रण, जलसंधारण प्रकल्प.

३) वाहतुक सुधारणा -सार्वजनिक वाहतुक बळकटीकरण, रस्ते सुधारणा, सिग्नल व्यवस्थापन, बससेवा.

४) युवकांसाठी रोजगार निर्मिती - स्र्टाअप सेंटर, कौशल्य विकास केंद्र, रोजगार मेळावे.

५) महिला सुरक्षा - महिला सुरक्षा व समक्षीदारण, पहिला हेल्पलाईन, सुरक्षित स्थळे, महिला उद्योजकांना प्रोत्साहन.

६) दर्जेदार शिक्षण आणि आरोग्य सुविधा - नवीन क्लिनीक, शाळांचे आधुनीकरण, विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती.