भाजप महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षपदी रंजना पाटील

जि. प. अध्यक्ष म्हणून यशस्वी कारकीर्द

भाजप महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षपदी रंजना पाटील
भाजप महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षपदी रंजना पाटील यांनानिवड पत्र देताना

कृषीसेवक न्यूज नेटवर्क / रावेर

जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ. रंजना प्रल्हाद पाटील यांची जळगांव(पुर्व) महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. प्रदेश सरचिटणीस विजय चौधरी यांच्या हस्ते त्यांना नियुक्ती पत्र देण्यात आले. यावेळी भाजपचे संघटनमंत्री रवी अनासपुरे, जिल्हाध्यक्ष अमोल जावळे, खासदार रक्षा खडसे, अजय भोळे, जिल्हा परिषदेच्या माजी उपाध्यक्ष व रावेर लोकसभा क्षेत्र प्रमुख नंदकिशोर महाजन यांच्या सह भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. या नियुक्तीबद्दल रंजना पाटील यांचे अभिनंदन होत आहे.