कृषीसेवक पुरस्कारार्थींची निवड यादी १५ ऑक्टोबरला होणार जाहीर
२६ नोव्हेंबरला रावेर येथे पुरस्काराचे वितरण
प्रतिनिधी / रावेर
साप्ताहिक कृषीसेवकतर्फे शेती व शेतीशी संबधीत क्षेत्रात उल्लेखनीय कार्यासाठी दिल्या जाणाऱ्या राज्यस्तरीय पुरस्कारासाठी निवड झालेल्या पुरस्कारार्थींची निवड यादी १५ ऑक्टोबरला जाहीर करण्यात येणार आहे. तर या पुरस्काराचे वितरण २६ नोव्हेंबरला रावेर येथे आयोजित सन्मान सोहळ्यात करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी कृषी व महसूलमंत्री, आमदार एकनाथराव खडसे उपस्थित राहणार असून पुरस्कार वितरण माजी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या हस्ते होणार आहे.
शेती व शेतीशी संबधीत क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व समाजासाठी प्रेरक ठरणाऱ्या राज्यातील भूमिपुत्रांना दरवर्षी साप्ताहिक कृषिसेवकतर्फे *राज्यस्तरीय पुरस्काराने* गौरविण्यात येते. यंदाचे पुरस्काराचे हे सहावे वर्ष आहे. शाल, पुष्पगुच्छ, सन्मानपत्र, स्मृतीचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप आहे. महाराष्ट्र राज्यातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा मान्यवरांच्या हस्ते व उपस्थितीत गौरविण्यात येणार आहे. या कार्यक्रमाचे आयोजन रावेर ता. रावेर जि. जळगाव येथे 26 नोव्हेंबर 2023 रोजी करण्यात येणार आहे.
शेती क्षेत्रात काम करताना स्वतःच्या कौशल्याने प्रगती करीत इतरांसाठी प्रेरणादायी ठरणाऱ्या व्यक्तींचा कृषिसेवकतर्फे दरवर्षी सन्मान करण्याची परंपरा आहे. आदर्श शेतकरी, आदर्श महीला शेतकरी, आदर्श युवा शेतकरी, आदर्श कृषी शास्त्रज्ञ, आदर्श कृषी तज्ञ, आदर्श कृषी उद्योजक, आदर्श कृषी मित्र, आदर्श कृषी विज्ञान केंद्र, आदर्श कृषी विज्ञान मंडळ/ आदर्श शेतकरी कंपनी/आदर्श शेतकरी गट, आदर्श कृषी व्यावसायिक या गटातून पुरस्कार दिले जाणार आहेत. निवड झालेल्या पुरस्कारार्थिंच्या कार्याचा आढावा असलेला विशेषांक यावेळी मान्यवरांच्या हस्ते प्रकाशित केला जाणार आहे. यासाठी विविध गटातील उत्कृष्ट कार्य करणाऱ्या व्यक्ती व संस्थांकडून प्रस्ताव मागविण्यात आले होते. निवड झालेल्या पुरस्कारार्थींची निवड यादी १५ ऑक्टोबरला जाहीर करण्यात येणार असून निवड झालेल्यांना निवड पत्र पाठविण्यात येणार आहे. संपर्क-- 9404243515 email -krushisevak2014@gmail.com
--