रावेर शिक्षण संवर्धक संघाच्या निवडणुकीत परिवर्तन : शीतल पाटील यांच्या पॅनलला 8 तर मुजुमदार यांच्या पॅनलला 3 जागा

सदस्यांनी विश्वास दाखवला : डॉ आठवले

रावेर शिक्षण संवर्धक संघाच्या निवडणुकीत परिवर्तन : शीतल पाटील यांच्या पॅनलला 8 तर मुजुमदार यांच्या पॅनलला 3 जागा

प्रतिनिधी / रावेर 

रावेर शिक्षण संवर्धक संघाच्या अत्यंत चूरशीच्या व अटीटतीच्या झालेल्या निवडणुकीत संस्थेच्या विद्यमान संचालकांच्या पॅनलला अवघ्या 3 जागा मिळाल्या. तर डॉ राजेंद्र आठवले व माजी नगराध्यक्ष शीतल पाटील यांच्या पॅनलला घवघवीत यश मिळाले असून 11 पैकी 8 जागावर विजय मिळाला .उमेदवार डॉ प्रेमराज पाटील व विजय सुंदरलाल लोहार यांना सामान 56 मते मिळाली. त्यामुळे फेर मतमोजणीची उमेदवाराने मागणी केल्याने यासाठी फेर मतमोजणी करण्यात आली. त्यात दोघांनाही फेर मतमोजणीत प्रत्येकी 56 मते मिळाल्याने शेवटी ईश्वर चिट्ठी टाकण्यात आली यात विजय लोहार यांच्या नावाची चिट्ठी निघाल्याने त्यांना विजयी घोषित करण्यात आले. 

आज रावेर शिक्षण संवर्धक संघाची संस्थेचे विद्यमान चेअरमन प्रकाश मुजुमदार यांच्या अध्यक्षतेखाली सर्वसाधारण वार्षिक सभा झाली. यात आगामी तीन वर्षाच्या काळासाठी संचालक पदाची निवडणूक घेण्यात आली. यात संस्थेचे विद्यमान चेअरमन प्रकाश मुजुमदार यांचे पॅनल व डॉ राजेंद्र आठवले, माजी नगराध्यक्ष शीतल पाटील यांच्या पॅनलमध्ये अटीटतीची निवडणूक झाली. त्यात मुजुमदार यांच्या पॅनलला अवघ्या 3 जागा मिळाल्या. तर संस्थेच्या सदस्यांनी बदल घडवीत डॉ राजेंद्र आठवले यांच्या पॅनलवर विश्वास दाखवत 8 जागा मिळवून दिल्या. या निवडणुकीत अध्यक्षपदी चंद्रकांत मिसर, उपाध्यक्षपदी डॉ राजेंद्र आठवले व सचिवपदी अक्षय अग्रवाल निवडून आले. निवडून आलेले संचालक पुढीलप्रमाणे : कंसात मिळालेली मते : डॉ दत्तप्रसाद दलाल (88), महेश अत्रे (84), शैलेंद्र देशमुख (93), शीतल पाटील (87), संतोष अग्रवाल (80), तुषार मानकर (62), उज्ज्वल अग्रवाल(60), विजय लोहार (56). निवडणुकीत संस्थेच्या 129 सदस्यांनी मतदानाचा हक्क बजावला. निवडणूक निर्णय अधिकारीम्हणून सुरेश धनके यांनी काम पहिले त्यांना संस्थेचे मुख्याध्यापक माजी मुख्याध्यापक व कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.

सदस्यांनी दाखवलेल्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही 

संस्थेच्या सदस्यांनी परिवर्तन करीत आमच्या पॅनलवर विश्वास दाखवला आहे. या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही. सर्वांना विश्वासात घेवून संस्थेच्या प्रगतीसाठी भावी काळात प्रयत्न केले जातील. जातीपतीचे राजकारण न करता सर्व समाजाच्या सदस्यांना पॅनलमध्ये स्थान दिल्याने विजय मिळाला.

---- डॉ राजेंद्र आठवले,  नवनिर्वाचित उपाध्यक्ष, रावेर शिक्षण संवर्धक संघ, रावेर