रावेरला ४ जानेवारीला राज्यस्तरीय कृषीसेवक पुरस्कार सन्मान सोहळा : पुरस्कारार्थींच्या नावाची प्राथमिक यादी जाहीर
विविध गटातून ३५ पुरस्कारार्थ्यांची निवड
प्रतिनिधी/रावेर
“शेतकऱ्यांच्या समृद्धीसाठी” हे ब्रीदवाक्य वाक्य घेवून साप्ताहिक कृषीसेवकचे राज्यात कृषी विस्ताराचे कार्य अखंडितपणे सुरु आहे. ११ व्या वर्धापनदिनाचे औचित्य साधून शेती व शेतीशी निगडीत क्षेत्रात महाराष्ट्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या प्रेरणादायी व्यक्तींना ४ जानेवारीला राज्यस्तरीय कृषीसेवक पुरस्कार प्रदान करून सन्मानित येणार आहे. हा गौरव सोहळा रावेर ता. रावेर जि जळगाव येथे आयोजित करण्यात येणार आहे. गेल्या सात वर्षात राज्यातील सुमारे ३०० भूमिपुत्रांना पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले असून यंदाचा हा ८ वा पुरस्कार वितरण व सन्मान सोहळा आहे.
राज्यभरातून शेतकरी, महिला शेतकरी, युवा शेतकरी, कृषीशास्त्रज्ञ, कृषीतज्ञ, कृषी मित्र, कृषी उद्योजक व कृषी संस्था या गटातून एकूण ३५ पुरस्कारार्थींची निवड करण्यात आली असून गटनिहाय पुरस्कारारार्थींच्या नावाची प्राथमिक यादी जाहीर करण्यात आली आहे. अंतिम यादी ३० नोव्हेंबरला जाहीर करण्यात येणार असून निवड झालेल्या पुरस्कारारार्थींच्या कार्याचा आढावा व परिचय असलेल्या गौरव विशेषांकाचे प्रकाशन या सोहळ्यात मान्यवरांच्या हस्ते करण्यात येणार आहे. निवड झालेली गटनिहाय पुरस्कारार्थीची यादी पुढीलप्रमाणे :
कृषिरत्न कृषीसेवक पुरस्कार : मधुकर चिंधूजी भलमे (रा. चारगाव बु. ता. वरोरा जि. चंद्रपूर), डॉ किशोर सुभाष शिंदे (रा पाकणी ता. उत्तर सोलापूर जि. सोलापूर), सदानंद हरी महाजन (रा. तांदलवाडी ता. रावेर जि. जळगाव)
आदर्श शेतकरी कृषीसेवक पुरस्कार : बालाजी दामोदर तुपे (रा. शेलगाव ता. फुलंब्री जि. छ. संभाजीनगर), डॉ. डीगंबर जानकीराम पाटील (रा. अटवाडा ता. रावेर जि. जळगाव), धर्मेश ईश्वर तांबोळी (रा. नंदुरबार जि. नंदुरबार), बालमुकुंद गरबड महाजन (रा. चुंचाळे ता. चोपडा जि. जळगाव), यादवराव केशवराव ढवळे (रा. शिरपूर ता. मालेगाव जि. वाशीम), आबासाहेब रामसिंग पाटील (रा. उंबरखेड ता. चाळीसगाव जि. जळगाव), राजू सुभान तडवी (रा. लोणी ता. चोपडा जि जळगाव), नितीन चंद्रकांत गायकवाड (रा. चांदखेड ता. मावळ जि. पुणे), कलिंदर सिकंदर तडवी (रा. किनगाव ता. यावल जि. जळगाव), किरण अशोक सूर्यवंशी (रा. बांबरूड राणीचे ता. पाचोरा जि. जळगाव),
आदर्श महिला शेतकरी कृषीसेवक पुरस्कार : स्वाती देवेंद्र राणे (रा विवरा ता रावेर जि जळगाव), सीमा चंद्रकांत जाधव (रा चिमळी ता. खेड जि. पुणे), भारती मनीष पाटील (रा. मस्कावदसीम ता. रावेर जि. जळगाव), चांदणीबाई बारेला (रा. गारखेडा ता. रावेर जि. जळगाव)
आदर्श युवा शेतकरी कृषीसेवक पुरस्कार : अमोल पांडुरंग ढोरमारे (रा खापरपांगरी ता. जि. बीड), दीपक रमेश महाजन (रा. सकाळी ता. यावल जि. जळगाव), दत्तात्रय भानुदास शेरकर (रा. रस्तापूर ता. नेवासा जि. अहिल्यानगर), सचीन शंकर आगळे (रा खामगाव ता नेवासा जि अहिल्यानगर), शिवराज रवींद्र मेटकर (रा. अमरावती), नामदेव तात्याभाऊ भामरे (रा पिंगळवाडे ता. सटाणा जि नाशिक), रमेश सुरेश बोबडे (रा कुऱ्हे ता भुसावळ जि जळगाव)
आदर्श कृषी शास्त्रज्ञ कृषीसेवक पुरस्कार : डॉ रमेश सोपान हापसे (रा. पुणे), डॉ भरत मालुंजकर (रा. निफाड ता. निफाड जि. नाशिक), डॉ सत्ताप्पा खारबडे (रा. राहुरी)
आदर्श कृषीतज्ञ कृषीसेवक पुरस्कार : गजानन म्हसळ (रा. सेलसुरा जि वर्धा), संजीव बाबासाहेब साठे-पाटील (रा. छ. संभाजीनगर)
आदर्श कृषी उद्योजक कृषीसेवक पुरस्कार : स्नेहा सर्जेराव पाटील(दुर्वांकुर थर्मोफॉर्मस अमरावती), प्रशांत आधार पाटील (अग्रेरीयन कन्सल्टंन्सी & सर्व्हिसेस जळगाव), श्रुतिका बागुल (सप्तरंग रिसर्च अँड ऑर्गानिक प्रा. लि. नागपूर)
आदर्श कृषी संस्था कृषीसेवक पुरस्कार : डॉ उल्हास पाटील कृषी महाविद्यालय जळगाव, सेंद्रिय शेती संशोधन व प्रशिक्षण केंद्र, म. फु. कृ. वि. राहुरी, पी. आर. पोटे-पाटील कॉलेज ऑफ अग्रीकल्चर अमरावती.
आदर्श शेतीमित्र कृषीसेवक पुरस्कार : युवराज गंगाराम वाघ (रा रोहाने ता शिंदखेडा जि. धुळे), अक्षय चेचरे गुरुकृपा उद्योग समूह लोहगाव ता. राहता जि. अहिल्यानगर

krushisewak 
