प्रशिक्षणार्थी जिल्हाधिकारी केझो यांची केऱ्हाळा ग्रामपंचायतीला भेट

विकास कामांची पाहणी करीत व्यक्त केले समाधान

प्रशिक्षणार्थी जिल्हाधिकारी केझो यांची केऱ्हाळा ग्रामपंचायतीला भेट
केऱ्हाळा बुद्रुक ग्रामपंचायतीच्या विकास कामांची पाहणी करतांना प्रशिक्षणार्थी जिल्हाधिकारी वेव्ह्तुला केझो, प्रभारी बिडीओ श्री वानखेडे, गरम विस्तार अधिकारी प्रवीण शिंदे, ग्रामपंचायत अधिकारी एस टी पाटील.

प्रतिनिधी / रावेर

रावेर तालुक्यातील केऱ्हाळा बुद्रुक ग्रामपंचायतीला प्रशिक्षणार्थी जिल्हाधिकारी वेव्ह्तुला  केझो यांनी भेट दिली. या भेटी दरम्यान त्यांनी ग्रामपंचायतीच्या विविध विकास कामांची पाहणी केली. जिल्हा परिषदेच्या मराठी व उर्दू माध्यमाच्या शाळांना भेट देवून विद्यार्थ्यांच्या तसेच अंगणवाडीतील बालकांची चौकशी केली. केझो यांनी शाळांतील शैक्षणिक स्थिती तसेच बालविकासाच्या संदर्भात माहिती घेतली. ग्रामपंचायतीतर्फे राबविण्यात आलेल्या विविध योजनांच्या माध्यमातून गावात झालेल्या विकास कामांची ग्रामपंचायत अधिकारी एस ती पाटील यांच्याकडून माहिती घेतल्यानंतर प्रशिक्षणार्थी जिल्हाधिकारी केझो यांनी ग्रामपंचायतीच्या कामकाजावर समाधान व्यक्त केले. विशेषतः, "स्वच्छ गाव योजना" अंतर्गत केलेल्या कामांची त्यांनी प्रशंसा केली आणि या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीबद्दल समाधान व्यक्त केले.

 यावेळी रावेर पंचायत समितीचे प्रभारी गट विकास अधिकारी के पी वानखेडे, विस्तार अधिकारी प्रवीण शिंदे, सरपंच दिपाली लहासे, उपसरपंच सविता पाटील, ग्रामपंचायत सदस्य, पोलीस पाटील वर्षा पाटील व ग्रामपंचायत अधिकारी एस टी पाटील यांच्यासह ग्रामपंचायतीचे कर्मचारी उपस्थित होते. ग्रामपंचायतीतर्फे प्रशिक्षणार्थी जिल्हाधिकारी केझो यांचे स्वागत करण्यात आले, आणि यावेळी त्यांनी केलेल्या विकास कामांच्या गुणवत्तेची प्रशंसा केली.