रावेर निवडणूक : प्रभाग ११ मधील भाजपचे सोपान पाटील यांचे पारडे जड

भाजपच्या माध्यमातून विकासाची हमी

रावेर निवडणूक : प्रभाग ११ मधील भाजपचे सोपान पाटील यांचे पारडे जड

प्रतिनिधी/रावेर

रावेर नगरपालिकेची निवडणूक अवघ्या दोन दिवसावर आली आहे. प्रचार शिगेला पोहचला असून प्रभाग क्र. ११ मधील भाजपचे उमेदवार सोपान साहेबराव पाटील यांनी मतदारांशी केलेला संपर्क व भाजपच्या माध्यमातून प्रभागाच्या विकासासाठी भविष्यात मिळणारा निधी यामुळे त्यांचे पारडे प्रतिस्पर्धी उमेदवारांच्या तुलनेत जड  असल्याची या प्रभागात चर्चा आहे. त्यामुळे येथून सोपान साहेबराव पाटील यांचा विजय निश्चित मनाला जात आहे.

रावेर नगरपालिकेच्या २ डिसेंबरला होणाऱ्या निवडणुकीकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे. याप्रभागातील लढत लक्षवेधी ठरली आहे. प्रभाग ११(ब) मधून सोपान साहेबराव पाटील यांना भाजपने उमेदवारी दिली आहे. सोपान पाटील यांचा या प्रभागात मोठा जनसंपर्क असून त्यांनी सहकार क्षेत्रात काम केलेले आहे. पिपल्स बँकेचे टे माजी अध्यक्ष व विद्यमान चेअरमन आहेत. तर त्यांच्या पत्नी मनीषा पाटील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालिका आहेत. समस्यांची सोडवणूक करण्याची त्यांच्यामध्ये असलेली हातोटी, पारदर्शी काम, स्पष्टवक्ता, कामाबाबत असलेली तत्परता व प्रभागाच्या विकासाचे असलेले व्हिजन यामुळे मतदारांचा त्यांच्यावर अधिक विश्वास आहे.

भारतीय जनता पक्षाने त्यांना उमेदवारी देत प्रभागाच्या विकासाला चालना देण्याचा प्रयत्न केला आहे. रावेर विधानसभा मतदार संघाचे आमदार भाजपचे अमोल जावळे आहेत तर रावेर लोकसभा मतदार संघाच्या खासदार रक्षा खडसे या सुद्धा भाजपच्या आहेत. त्यामुळे या प्रभागाच्या विकासासाठी त्यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर भविष्यात निधी मिळू शकेल असा आशावाद मतदारांना आहे. तसेच मान्य प्रभागातील समस्या व नागरिकांचे प्रश्न प्रभावीपणे सोपान पाटील मांडतील असा विश्व मतदारांना आहे. त्यामुळे प्रतिस्पर्धी उमेदवारांच्या तुलनेत आज तरी भाजपचे उमेदवार सोपान साहेबराव पाटील यांचे पारडे जड असून मतदारांचा त्यांना कौल मिळण्याची अधिक शक्यता आहे.