डॉ. संदीप पाटील आयएमए ताप्ती व्हॅली संस्थेचे अध्यक्ष : सचिवपदी डॉ सुचिता कुयटे, डॉ उमेश पिंपळे

रावेरला संस्थेच्या सभेत झाली निवड

डॉ. संदीप पाटील आयएमए ताप्ती व्हॅली संस्थेचे अध्यक्ष : सचिवपदी डॉ सुचिता कुयटे, डॉ उमेश पिंपळे

प्रतिनिधी/ रावेर

ताप्ती व्हॅली संस्थेच्या (यावल-फैजपूर-सावदा-रावेर) अध्यक्षपदी रावेर येथील माऊली हॉस्पिटलचे संचालक डॉ संदीप पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. 

संस्थेच्या झालेल्या सर्वसाधारण सभेत सर्वानुमते ही निवड करण्यात आली. या संस्थेच्या सदस्यांची सभा रावेर येथे आयोजित करण्यात आली होती. त्यात डॉ. मिलिंद वानखेडे यांनी पुढील काळासाठी अध्यक्षपदासाठी डॉ. संदीप पाटील यांचे नाव सुचवले होते. त्याला डॉ. सुनील चौधरी (सावदा) व डॉ. प्रवीण चौधरी (रावेर) यांनी अनुमोदन दिले. तसेच संस्थेच्या सचिव पदासाठी डॉ. सुचिता कुयटे (रावेर) व डॉ. उमेश पिंपळे (सावदा) यांचे नाव सुचवण्यात आले. त्यासाठी अनुमोदन डॉ. दत्तप्रसाद दलाल (रावेर) व डॉ. व्ही. जे. वारके (सावदा) यांनी दिले . नवनिर्वाचित अध्यक्ष व सचिव यांना सर्वानुमते मंजुरी देण्यात आली. सभेमध्ये नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमानंतर डॉ. दत्तप्रसाद दलाल यांनी इन्कम टॅक्स या विषयावर माहिती दिली. तसेच डॉ. समृद्धी प्रवीण पाटील हिने एम.बी.बी.एस पूर्ण केल्याबद्दल आयएमए संस्थेतर्फे तिचा सत्कार करून अभिनंदन करण्यात आले. आयएमए संस्थेच्या यावल, रावेर ,फैजपूर व सावदा येथील सदस्यांची यावेळी उपस्थिती होती.

आयएमएचे समाजात मनांकन वाढवू : डॉ संदीप पाटील 

संस्थेच्या अध्यक्षपदी डॉ संदीप पाटील यांची निवड झाल्यावर त्यांचा संस्थेच्या पदाधिकाऱ्यांतर्फे सत्कार करण्यात आला. यावेळी संस्थेच्या सदस्यांनी व पदाधिकाऱ्यांनी अनेक वर्षांपासून आयएमएतर्फे विविध उपक्रम राबवून समाजामध्ये एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. यापुढे याच पद्धतीने काम करून आयएमएचे मानांकन वाढविण्याचा प्रयत्न केला जाईल असे आश्वासन डॉ संदीप पाटील यांनी सत्काराला उत्तर देताना दिले. यावेळी सर्व सदस्यांचे त्यांनी आभार मानले.