हायटेक शेतीचा नवा हुंकार : जैन इरिगेशनतर्फे १४ डिसेंबरपासून कृषी महोत्सवाचे जळगावात आयोजन : शेतकऱ्यांना पाहता येणार विविध पिकातील आधुनिक तंत्रज्ञान

शेतकऱ्यासाठी फ्युचर फार्मिंग शेतीच्या आधुनिक तंत्रज्ञानांचे दालन खुले

हायटेक शेतीचा नवा हुंकार : जैन इरिगेशनतर्फे १४ डिसेंबरपासून कृषी महोत्सवाचे जळगावात आयोजन : शेतकऱ्यांना पाहता येणार विविध पिकातील आधुनिक तंत्रज्ञान

प्रतिनिधी / जळगाव

शेतीच्या क्षेत्रातील जागतिक आधुनिक तंत्रज्ञान जैन इरीगेशनने जळगाव येथील जैन हिल्सवर उभे केले आहे. राज्यभरातील व राज्याच्या बाहेरील शेतकऱ्यांपर्यंत हे तंत्रज्ञान पोहचून त्यांनी स्वताच्या शेतीत बदल करावा यासाठी जैन इरिगेशनचे सातत्याने प्रयत्न सुरु आहेत. हे तंत्रज्ञान शेतकऱ्यांना पाहता यावे यासाठी गेल्या वर्षापासून हायटेक शेतीचा नवा हुंकार हा कृषी महोत्सव खास शेतकऱ्यांसाठी राबविला जात आहे. येत्या १४ डिसेंबर पासून या महोत्सवाला प्रारंभ होत आहे. एक महिनाभर हा महोत्सव सर्वांसाठी खुला राहणार आहे.

शेतीला व्यावसायिक स्वरूप दिल्याशिवाय शेतकऱ्यांची आर्थिक प्रगती शक्य होणार नाही हे ओळखून पद्मश्री स्व भवरलाल जैन यांनी जैन इरिगेशनची स्थापना केली होती. शेती क्षेत्रातील आधुनिक तंत्रज्ञान स्व. जैन यांनी जैन इरिगेशनच्या माध्यमातून शेतकऱ्यांपर्यंत पोहचविण्याचा सातत्याने प्रयत्न केला. जगभरातील शेतीतील आधुनिक तंत्रज्ञान त्यांनी जळगाव येथे आणून शेतकऱ्यांना प्रयोगाद्वारे शेतीतील तंत्रज्ञान दाखवण्यावर भर दिला. याचा लाभ राज्यातील व देशातील असंख्य शेतकऱ्यांना झाला आहे. शेतकऱ्यांचा खऱ्या अर्थाने विकास व्हायचा असेल तर शेतीला आधुनिकतेची जोड देणे गरजेचे आहे. हे ओळखून विविध पिकातील आधुनिक तंत्रज्ञान शेतकऱ्यांना उघड्या डोळ्यांनी पाहता यावे यासाठी जैन इरिगेशनतर्फे हायटेक शेतीचा नवा हुंकार या कृषी महोत्सवाचे आयोजन केले जात आहे.  येत्या १४ डिसेंबरपासून या महोत्सवाला सुरुवात होत आहे. १४ जानेवारी २०२५ पर्यंत एक महिनाभर हा कृषी महोत्सव चालणार आहे.  यात शेतकऱ्यांना अत्याधुनिक तंत्रज्ञानांचा वापर करून केल्या जाणाऱ्या शेतीचे प्रयोग प्रत्यक्षात पाहण्याची संधी जैन इरिगेशनने या माध्यमातून उपलब्ध करून दिली आहे. या महोत्सवला भेट देणाऱ्या शेतकऱ्यांना शेती हि नफा मिळवून देणारी व फायद्याची होऊ शकते याचे साक्षात दर्शन या महोत्सवातून घडणार आहे. या कृषी महोत्सवात अधिकाधिक शेतकऱ्यांनी सहभागी होऊन आपल्या शेतीत बदल करीत आर्थिक प्रगती करावी. या महोत्सवात सहभागासाठी खालील क्यू आर कोड स्कॅन करून नाव नोंदणी करण्याची सुविधा उपलब्ध आहे.