रावेर पिपल्स बँकेची दोन पॅनलमध्ये सरळ लढत : ओबीसी मतदार संघातील लढत ठरणार लक्षवेधी

१० जूनला निवडणूक

रावेर पिपल्स बँकेची दोन पॅनलमध्ये सरळ लढत   :  ओबीसी मतदार संघातील लढत ठरणार लक्षवेधी
१३ नारळाचे तोरण अर्पण करताना

प्रतिनिधी / रावेर 

रावेर तालुक्यातील अग्रगण्य समजल्या जाणाऱ्या रावेर पीपल्स बँकेची १० जूनला निवडणूक होत आहे. या निवडणुकीसाठी सहकार व लोकमान्य या दोन पॅनलमध्ये सरळ लढत होत आहे. रावेर नगरपालिकेची रंगीत तालीम म्हणून या निवडणुकीकडे पहिले जात आहे. दोन्ही पॅनलने त्यांचे उमेदवार जाहीर केले आहेत. २९ मेपर्यंत माघार घेण्यासाठी मुदत असली तरी त्यापूर्वीच प्रचाराची आघाडी सहकार पॅनलने घेतली आहे. 

पिपल्स बँकेच्या सर्वसाधारण ८, महिला राखीव २, ओबीसी १, भटक्या विमुक्त जाती जमाती १, व अनुसूचित जाती जमाती १ अशा एकूण १३ जगासाठी ही निवडणूक होत आहे. काँग्रेसचे  माजी तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर महाजन यांच्या नेतृत्वात सहकार तर शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख प्रल्हाद महाजन यांच्या नेतृत्वात लोकमान्य पॅनल समोरासमोर ठाकले आहे. लोकमान्य पॅनलने ओबीसी मतदार संघातून भाजपचे शहराध्यक्ष दिलीप हिरामण पाटील यांना उमेदवारी देत सहकार पॅनल प्रमुख ज्ञानेश्वर महाजन यांच्यापुढे कडवे आव्हान उभे केले आहे. महाजन हे सहकार पॅनलचे ओबीसी मतदार संघाचे उमेदवार आहेत.  

१३ नारळाचे तोरण 

सहकार पॅनलने बुधवारी पॅनलमधील उमेदवारांची यादी जाहीर केल्यानंतर गुरुवारी येथील पराचा गणपती मंदिरात प्रचाराचा शुभारंभ केला. यावेळी मंत्रोपचारात पूजन करून पॅनलमध्ये उमेदवारांची संख्या १३ असल्याने १३ नारळाचे तोरण मंदिराला अर्पण करण्यात आले. हा दिवसभर चर्चेचा विषय ठरला.   

सहकार पॅनलचे उमेदवार

सर्वसाधारण मतदार संघ :-  राजेंद्र पंढरीनाथ चौधरी, पंकज राजीव पाटील, यशवंत व्यंकट पाटील(वाय व्ही पाटील), यादवराव विष्णू पाटील, सोपान बाबुराव पाटील, एकनाथ जगन्नाथ महाजन (ई जे महाजन), विपीन विजय राणे, कैलास दयालदास वाणी. 

महिला राखीव :- पुष्पाबाई गणेश महाजन , मीराबाई चंपालाल राऊत. 

ओबीसी राखीव :- ज्ञानेश्वर हरिभाऊ महाजन. 

भटक्या जाती - महेंद्र राजाराम पवार. 

एससी/ एसटी राखीव :-  विनोद नारायण तायडे

लोकमान्य पॅनलचे उमेदवार :

सर्वसाधारण मतदार संघ :- प्रल्हाद रामदास महाजन, संजय गंगाधर वाणी, सोपान साहेबराव पाटील, विनायक सीताराम पाटील, पितांबर रामभाऊ पाटील, राजेश सुधाकर शिंदे, मानस अरुण कुलकर्णी, रवींद्र प्रभाकर महाजन 

महिला राखीव :- योगिनी राजेश पाटील, शैलजा अशोक महाजन, 

ओबीसी राखीव :- दिलीप हिरामण पाटील 

भटक्या जाती -  प्रवीण सुपडू पासपोहे 

एससी/ एसटी राखीव :-  विकास(मिलिंद) वामन अवसरमल